काल रात्री Google चा या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट पार पडला. इव्हेंटची सुरुवात सीईओ सुंदर पिचाई यांच्या भाषणाने झाली. गुगलने या इव्हेंटमध्ये आपले AI Bard देखील लॉन्च केले आहे. कंपनीने ही घोषणा केली , Bard चॅटबॉट हा १८० देशांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच उर्वरित देशांमध्ये लवकरच बार्ड सुरु गुगलने सांगितले आहे. सध्या वापरकर्त्यांना एआय बार्डमध्ये इंग्रजी, जपानी आणि कोरियन या तीनच भाषांचा सपोर्ट मिळणार आहे. लवकरच याला अन्य भाषांचा देखील सपोर्ट मिळणार आहे.
हा इव्हेंट होण्यापूर्वी गुगल बार्डबाबत जगभरामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. या इव्हेंटमध्ये AI bard बाबत कंपनीने अधिकच्या विस्तृतपणे माहिती दिली आहे. AI BARD हा गुगलचा चॅटबॉट आहे. त्याच्या मधील खास फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
१. BARD ला १८० देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये सध्या ३ भाषांचा सपोर्ट असणार आहे. मात्र लवकरच याला ४० भाषांचा समोरच्या मिळणार आहे.
२. AI आधारित Bard चॅटबॉट पूर्णपणे सुरक्षित असणार आहे. यामध्ये व्हिज्युअलचाही सपोर्ट देण्यात आला आहे.
३. गुगल बार्डमध्ये लवकरच हिंदी, बांगला आणि फारसी या भाषांचा सपोर्ट देण्यात येणार आहे.
हेही वाचा : Google I/O 2023: आता डिजिटल वॉचमध्ये देखील वापरता येणार WhatsApp, महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
४. Bard मध्ये कंपनीने २० पेक्षा जास्त प्रोग्रामिंग भाषांचा सपोर्ट दिला आहे. हे एकापेक्षा अधिक भाषांमध्ये कोडिंग करण्यासाठी सक्षम असणार आहे.
५. Bard हे थेट इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे देईल असे गुगलने सांगितले.
६. गुगल बार्ड हे गुगलच्या सर्व्हिससह Adobe Firefly सोबत काम करणार आहे.
जेव्हा या वर्षीच्या सुरुवातीला AI बार्डची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून ओपनएआय ChatGpt च्या विपरीत सार्वजनिक रित्या प्रदर्शन न केल्यामुळे टीकेचा सामना करावा लागला होता.
गुगल बार्ड हे स्वतःच्या भाषेवर आधारित मॉडेल आहे. ज्याला LaMDA म्हणतात. ChatGpt प्रमाणे बार्ड वापरकर्त्यांना प्रश्न टाईप करून देते. मागच्या महिन्यामध्ये गुगलने बार्डचे गणित, तर्कशास्त्र आणि कौशल्यांसह त्याची कोडिंग क्षमता वाढवली होती.