Google I/O 2023 इव्हेंटमध्ये कंपनीने अधिकृतपणे मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमची नवीन सिरीज Android 14 लॉन्च केले आहे. काल Google I/O नंतर गुगलने पिक्सल डिव्हाईससाठी Android 14 Beta 2 रोलआऊट केले आहे. त्याचे पहिले बीटा हे पिक्सेल स्मार्टफोन्सपुरते मर्यादित असून, दुसरा बीटा फोन, टॅबलेट आणि फोल्डेबल फोनसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लॉक स्क्रीनसाठी वापरकर्त्यांना अनेक कस्टमायझेशनचा पर्याय, जनरेटिव्ह AI वॉलपेपर्स, enhanced widget customization, फाईंड माय डिव्हाईसला एक मोठे अपडेट मिळणार आहे. तसेच ईमोजी वॉलपेपरसह तुम्हाला अनेक फीचर्स मिळणार आहेत. वापरकर्ते त्यांचे डिव्हाईस अत्यंत चांगल्या प्रकारे वापरू शकावेत म्हणून Android 14 सह Google चा मुख्य फोकस हा accessibility फीचर्सवर असणार आहे. Android 14 मध्ये वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आली आहेत.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला

हेही वाचा : Google I/O 2023 मध्ये लॉन्च झाले Android 14; नोटिफिकेशन येताच कॅमेऱ्यामध्ये…, जाणून घ्या फीचर्स

Google Android 14 आणखी विकसित आणि ऑप्टिमाइझ करण्यासाठी iQOO, Lenovo, Nothing, OnePlus, OPPO, Realme, Tecno, vivo आणि Xiaomi सोबत पार्टनरशिप केली आहे. मात्र यामध्ये अँड्रॉइड १४ बीटा प्रोग्रॅममध्ये Samsung चा समावेश नाही आहे. वरील कोणत्याही ब्रॅण्डचा फ्लॅगशिप स्मार्टफोन तुम्ही खरेदी केला असल्यास तुमच्या डिव्हाइसला Android 14 चा सुरुवातीचे बीटा बिल्ड मिळण्याची शक्यता आहे.

कोणत्या स्मार्टफोन्सना Android 14 बीटाचे अपडेट ?

Pixel 4a (5G)
Pixel 5 and 5a
Pixel 6 and 6 Pro
Pixel 6a
Pixel 7 and 7 Pro
Pixel 7a
Pixel Fold
Pixel Pad
Vivo X90 Pro
iQOO 11
Lenovo Tab Extreme
Nothing Phone (1)
Oppo Find N2
Oppo Find N2 Flip
OnePlus 11
Tecno Camon 20 series
Realme GT 2 Pro
Xiaomi 13 Pro
Xiaomi 13
Xiaomi 12T
Xiaomi Pad 6

हेही वाचा : Google I/O 2023: आता डिजिटल वॉचमध्ये देखील वापरता येणार WhatsApp, महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

तुमच्या डिव्हाइसवर Android 14 beta 2 कसे डाउनलोड करावे?

Google Pixel चे वापरकर्ते Android डेव्हल्परच्या प्लॅटफॉर्मद्वारे Android 14 बीटामध्ये प्रवेश मिळवू शकतात.पिक्सेल नसलेले वापरकर्ते हे OEM च्या वेबसाइटवरून Android 14 बीटा डाउनलोड करू शकतात. Link to download Android 14 beta या लिंकवरून वापरकर्ते डाउनलोड करू शकतात.