गुगल (Google) हे सर्वात मोठे सर्च इंजन आहे. आपण आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर सर्वात पहिल्यांदा गुगलवर जाऊन शोधतो. ऑनलाइन सेवांचा वापर करणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याला नेहमीच सायबर धोक्याची चिंता सतावत असते. त्यांचे डिव्हाइस सहजपणे हाक होऊ शकते याची काळजी वापरकर्त्याला असते. सायबर हल्ला झाल्यास ते त्यांचे पैसे आणि डेटा गमावू शकतात. त्यामुळे ऑनलाइन चोरी आणि फसवणुकीपासून आपल्या वापरकर्त्यांची संरक्षण करण्यासाठी गुगलने भारतातील Google One वापरकर्त्यांसाठी ‘डार्क वेब रिपोर्ट’ नावाचे एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. हे फिचर नक्क्की काय आहे ते जाणून घेऊयात.

जर का कोणत्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, फोन नंबर, ईमेल ऍड्रेस लीक झाला तर याची माहिती गुगल तुम्हाला देणार आहे. गुगलद्वारे देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर वापरकर्ते आपल्या अकाऊंटची सुरक्षा सुनिश्चित करू शकतात. डार्क वेब फिचर हे इंटरनेटचा छुपा भाग आहे जिथे बरेच लोकं बेकायदेशीर काम करण्यात गुंतलेले असतात. उदाहरणार्थ चोरी केलेली वैयक्तिक माहितीची विक्री करणे. अशा वेळी गुगलचे डार्क वेब रिपोर्ट कामाला येते.

Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
Arvind kejriwal dr babasaheb ambedkars Fact Check marathi
अरविंद केजरीवालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले ‘ते’ आक्षेपार्ह विधान खरंच तसे आहे का? वाचा, VIRAL VIDEO ची खरी बाजू….
Shocking Video : Pune PMT Bus Front Glass falls off due to high speed
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले
Grandmother dances on pushpa 2 peelings song video viral on social media
काय भारी नाचलीय! ‘पुष्पा-२’ चित्रपटातील गाण्यावर थिरकली आजी, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Success Story of Trishneet arora founder of tac security once failed in 12th now reliance and bsc are his clients
शाळा सोडली, बारावीत नापास झाला पण हार मानली नाही! पाहा पठ्ठ्याने कशी सुरू केली अब्जावधीची कंपनी; आता रिलायन्स, BSE सारख्या मोठ्या कंपन्यांना देतोय सेवा

हेही वाचा : आता नेटफ्लिक्सचा अधिक आनंद घेता येणार; Reliance Jio ने लॉन्च केले ‘हे’ दोन प्रीपेड प्लॅन्स

नियमित Google वापरकर्ते डार्क वेबवर त्यांच्या ईमेल पत्त्याशी छेडछाड झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी देखील हे फिचर वापरू शकतात. मात्र त्यांना गुगल वन वापरकर्त्यांप्रमाणे सतत मॉनिटरिंग उपलब्ध असणार नाही. जर का तुम्ही गुगल वनचे सदस्य आहात तर तुमचे नाव, जन्मतारीख, ईमेल ऍड्रेस तिथे आहेत की नाही हे तपासण्यासाठी डार्क वेब रिपोर्ट फीचरचा वापर करू शकता. रिअल-टाइम अपडेट आणि कोणतेही नवीन सर्च कसे हाताळायचे याबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ते सेट देखील करू शकता.

डार्क वेब रिपोर्ट फिचर कसे सेट करायचे?

१. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील Google One वेबसाइटवर जावे.

२. डार्क वेब रिपोर्ट सर्च करून सेट अप वर क्लिक करावे.

३. तुम्हाला जे डिटेल्स मॉनिटर करायचे आहे ते निवडावे. (तुम्ही इच्छित असल्यास तुमचा घरचा पत्ता देखील जोडू शकता).

४. आपली मॉनिटरिंग प्रोफाइल तयार करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या सूचनांचे पालन करा.

५. स्कॅन सुरू करण्यासाठी Done वर क्लिक करावे. क्लिक केल्यावर तुमचे डिटल्स डार्क वेब आहे की नाही हे पाहू शकता.

Story img Loader