गुगल ही दिग्गज टेक कंपनी आहे. गुगलने आपल्या पुढील जनरेशनमधील फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 8 सीरिजच्या अधिकृत लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. पिक्सेल ८ लाइनअप बेस आणि प्रो मॉडेलसह ऑक्टोबर २०२२ मध्ये रिलीज झालेल्या पिक्सेल ७ सिरीजची जागा घेण्यासाठी तयार आहे. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर ही सिरीज लॉन्च होणार आहे. कंपनीने अलीकडेच आगामी लाइनअपमधून प्रो मॉडेलचे डिझाइन लीक केले आहे. मुख्य स्पेसिफिकेशन्स आणि फोन्सच्या इतर तपशीलांबद्दल काही आठवड्यांपासून अफवा समोर येत आहेत.
एक दोन दिवसांपूर्वीच Apple कंपनीने आपल्या iPhone 15 सिरिजच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. त्यानंतर लगेचच गुगलने आपल्या Pixel 8 सिरीजच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.
मेड बाय गुगल (@madebygoogle) च्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटद्वारे पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये कंपनीने स्पष्ट केले की पिक्सेल ८ आणि पिक्सेल ८ प्रो सिरीज ४ ऑक्टोबरला रोजी लॉन्च केला जाणार आहे. याचा लॉन्च इव्हेंट न्यूयॉर्कमध्ये आयोजित केला जाणार आहे. तो इव्हेंट स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होईल.
एक दिवस आधीच Apple ने घोषणा केली आहे की, आयफोन १५ सिरीजचे लॉन्चिंग १२ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील Apple पार्क येथे होणार आहे. या इव्हेंटला Wonderlust असे नाव देण्यात आले आहे. हा इव्हेंट स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता Apple.com आणि Apple TV App वे लाईव्ह पाहता येणार आहे.
अलीकडेच लीक झालेल्या Pixel 8 Pro डिझाइनमध्ये, स्मार्टफोन पोर्सिलेन (Porcelain) व्हाइट रंगामध्ये पाहण्यात आले होते. जरी तो आधीच्या Pixel 7 Pro सारखा दिसत असला तरी, कॅमेर्यावर ट्रिपल रीअर कॅमेऱ्यावर सिंगल पिल शेप आकाराचे युनिट दिसून आले. Pixel 8 सिरीज देखील AI आधारित कॅमेऱ्यांसह लॉन्च होऊ शकतात. तसेच गुगलच्या कॅमेरा अप्लिकेशनला एन नवीन वापरकर्ता इंटरफेस मिळणार असल्याची नोंद करण्यात आली आहे. तथापि या सर्व शक्यता आहेत. कंपनीने अजून याबद्दल कोणतीही पुष्टी केलेली नाही.