एखादी कंपनी आपल्या प्रोजेक्टबद्दल किंवा किंवा महत्वाच्या विषयाबद्दल माहिती पाठवण्यासाठी G-Mail चा वापर करते. जीमेलवरून तुम्ही महत्वाच्या फाइल्स सेंड करू शकता. जीमेलचा उपयोग सर्वत्र केला जातो. आता गुगलने आपल्या जीमेलसाठी एक नवीन फिचर आणले आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना आपले ईमेल ट्रान्सलेट करता येणार आहेत. तर जीमेलमध्ये गुगलने आणलेल्या या फीचरचा फायदा वापरकर्त्यांना कसा होणार आहे तसेच कोणकोणत्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
गुगलने जीमेलसाठी आणलेल्या फीचरच्या मदतीने ईमेल ट्रान्सलेट करता येणार आहेत. हे फिचर Android आणि iOS डिव्हाइसेससाठी लॉन्च करण्यात आले आहे. हे फिचर आलेल्या ईमेलची भाषा ओळखते आणि ईमेल ऑटोमॅटिक ट्रान्सलेट करते. आधी हे फिचर डेस्कटॉप व्हर्जनसाठी होते. तसेच १०० पेक्षा अधिक भाषांमध्ये ट्रान्सलेट करता येणार आहे. याबाबतचे वृत्त techcrunch ने दिले आहे.
हेही वाचा : केवळ २,७४९ रुपयांमध्ये iPhone 12 खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय मोठा डिस्काउंट
गुगलने आपल्या वर्कस्पेस अपडेट्स ब्लॉगवर रोमांचक बातमी जाहीर केली. हे फिचर मोबाइल वापरकर्त्यांसाठी ”खूप विनंती केलेले फिचर” आहे. पहिल्यांदा जर का वापरकर्त्यांना ईमेलचे ट्रान्सलेशन करायचे असेल तर, त्यांना तो कंटेंट गुगल ट्रान्सलेटमध्ये कॉपी किंवा पेस्ट करावा लागायचा किंवा त्याचा स्क्रिनशॉट घेऊन तो गुगल लेन्सवर अपलोड करावा लागायचा. असे कंपनीने ब्लॉगपोस्ट मध्ये म्हटले आहे.
मोबाइलवर कोणत्याही मेसेजला ट्रान्सलेट करण्यासाठी, वापरकर्त ईमेलच्या वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स ओव्हरफ्लो मेनूमध्ये असलेल्या ”ट्रान्सलेट” पर्यायावर क्लिक करतात. वापरकर्ते सेटिंग्जमध्ये त्याची आउटपुट भाषा निवडू शकतात. जेव्हा ईमेलचा कंटेंट ”जीमेल डिस्प्ले भाषा” शी जुळत नाही. तेव्हा एक प्रॉम्प्ट दिसून येतो. एका विशिष्ट भाषेसाठी बॅनर पॉप अप होऊ नये असे वाटत असल्यास ते ट्रान्सलेशनची निवड रद्द करू शकतात.
पुढील दोन आठवड्यांमध्ये हे ट्रान्सलेशन फिचर हळूहळू Android वापरकर्त्यांसाठी रोल आउट होईल. हे फिचर २१ ऑगस्टपासून iOS डिव्हाइसवर लॉन्च होईल.