Google reading mode feature : अँड्रॉइडने स्मार्टफोन्स आणि स्मार्टवॉचेससाठी एक अपडेट जारी केला आहे. या अपडेटमुळे युजरचा उपकरण वापरण्याचा अनुभव चांगला होणार आहे. गुगलने ‘रिडिंग मोड’ हे नवीन फीचर उपलब्ध केले असून डिजिटल कार की, गुगल टीव्ही आणि वॉच ओएससाठी नवीन अपडेट मिळत आहे. रिडिंग मोड फीचरममुळे कमी दृष्टी, अंधत्व आणि डिस्लेक्सिया असलेल्या लोकांना फायदा होईल, असा गुगलचा दावा आहे.
काय आहे रिडिंग मोड?
कस्टमाइज करता येणारे कॉन्ट्रास्ट, टेक्स्ट साइज, टेक्स्ट टू स्पीच आणि अॅप आणि वेब पेजेसच्या फाँट टाइपच्या माध्यमातून युजरला मोबाईल वापरने सुलभ जावे हा गुगलच्या रिडिंग मोड फीचरचा हेतू आहे. या फीचरमध्ये स्पीड कंट्रोलसह आधुनिक टेक्स्ट टू स्पीच फंक्शन आहे. युजर्स नैसर्गिक वाटणारे आवाज निवडू शकतात. फीचर इंग्रजी, फ्रेंच, इटालियन आणि स्पॅनिश भाषेसह सादर करण्यात आले आहे.
(‘APPLE’साठी हा वर्ष ठरला जबरदस्त! 2023 मध्ये लाँच करू शकते ‘ही’ भन्नाट उपकरणे, यादीवर टाका एक नजर)
रिडिंग मोड कसे वापरायचे?
फीचर अॅक्टिव्हेट करण्यासाठी युजरला रिडिंग मोड अॅप गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करावे लागेल. इन्स्टॉल झाल्यावर अॅप डिव्हाइसच्या क्विक सेटिंग्समध्ये समाविष्ट होतो आणि त्यानंतर ते अॅप किंवा वेब पेजेसमध्ये वापरता येऊ शकते. या अॅप्लिकेशनचा वापर करून युजर्स त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार कंटेंट डिस्प्लेमध्ये बदल घडवू शकतात.