रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुगलने मोठी कारवाई केली आहे. गुगलने युक्रेनमध्ये रशियन मोबाईल अ‍ॅप आरटी चॅनेलवर बंदी घातली आहे. म्हणजेच युक्रेनमधील लोक यापुढे आरटी चॅनेल डाउनलोड करू शकणार नाहीत. वृत्तसंस्था एएनआयने रविवार २७ फेब्रुवारीला रशियन कम्युनिकेशन एजन्सी स्पुतनिकच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक्रेन सरकारच्या विनंतीवरून गुगलने ही कारवाई केल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. असे सांगण्यात आले आहे की कीवने गुगलला युक्रेनमध्ये आरटी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करण्यावर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. कीवच्या या विनंतीवरून गुगलने मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

Russia-Ukraine War : रशियाच्या सायबर हल्ल्यातून थोडक्यात बचावला युक्रेन; जाणून घ्या हे व्हायरस कसे काम करते

ब्रॉडकास्टरने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. तत्पूर्वी, गुगलने जाहीर केले की त्यांनी रशियन माध्यमांच्या या चॅनेलवर बंदी आणली आहे. जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने आरटी चॅनलवर पूर्णपणे बंदी घातल्याचे म्हटले आहे. युक्रेनवर रशियाच्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी माध्यमांच्या सर्व प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे, असेही गुगलने म्हटले आहे.

Ukraine War : “मला वाचवा!”; युक्रेनमधून केरळच्या ‘चपाती’ने भारत सरकारकडे मागितली मदत

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही प्रचार केला जात आहे. विश्‍लेषकांनी म्हटले आहे की, टिकटॉकच्या मदतीने रशिया युक्रेनविरोधात सतत अपप्रचार करत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google major action in the wake of the ukraine russia war bans this russian app pvp