व्हॉट्सअ‍ॅप कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘लोकेशन शेअरिंग’ फीचरबद्दलच तर माहितीच असेल; ज्याच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या युजरला आपले रिअल टाइम लोकेशन शेअर करू शकता. सेटिंग गेल्यावर लोकेशन हा पर्याय दिसेल. तिथे तुम्हाला लाइव्ह लोकेशन आणि तुमचे आताचे लोकेशन पाठवा (Send Your Curent Location) असे पर्याय येतात. त्यानंतर तिथे तुमच्या लोकेशननुसार काही पर्याय दिले जातात त्यावर क्लिक केल्यास तुम्ही जिथे आहात, ते लोकेशन तुमच्या कुटुंबाला किंवा मित्र-मैत्रिणींना तुम्ही सहज पाठवू शकता.

तर आता हे खास फीचर गूगल मॅपदेखील अ‍ॅण्ड्रॉइड, आयओएस आणि पीसीच्या वापरकर्त्यांसाठी घेऊन येत आहे. गूगल मॅप्सवरून युजर्स त्यांचे रीअल टाइम लाइव्ह लोकेशन त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करू शकणार आहेत.गूगल मॅप्सवरील रीअल टाइम लाइव्ह लोकेशन अगदीच व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच असेल. तुम्ही इतरांना पाठवलेले लाइव्ह लोकेशन कोण आणि किती वेळ पाहू शकेल याचासुद्धा तुम्हाला पर्याय दिला जाईल. तसेच खास गोष्ट अशी की, जेव्हा तुम्ही लोकेशन एखाद्या व्यक्तीस शेअर कराल तेव्हा ते तुमच्या डिव्हाइसची बॅटरी पॉवर आणि चार्जिंगसुद्धा समोरची व्यक्ती पाहू शकेल.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

हेही वाचा…स्वस्त किमतीत मिळणार जबरदस्त फिचर्स! जाणून घ्या Boat च्या नवीन स्मार्टवॉचबद्दल…

लोकेशन शेअरिंगवरील गूगलच्या सपोर्ट पेजनुसार मॅप्समध्ये लोकेशन हिस्ट्री बंद असताना देखील हे फीचर काम करते. हे फीचर अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस वर अगदी त्याच प्रकारे कार्य करते. तुमचे लाइव्ह लोकेशन ‘गूगल मॅप्स’वरून इतरांना पाठवण्यासाठी तुमच्या अ‍ॅण्ड्रॉइड, आयफोन किंवा आयपॅडच्या गूगल मॅप्स या अ‍ॅपवर जा, वरच्या उजवीकडे प्रोफाइल चिन्हावर टॅप करा आणि लोकेशन शेअरिंग निवडा. त्यानंतर तुम्हाला तुमचे लोकेशन किती काळ शेअर करायचे आहे हे निवडण्याचा पर्याय मिळेल (तुम्ही एक दिवसापर्यंत तुमचे स्थान शेअर करणे निवडू शकता).

तुम्ही गूगल संपर्क (Google Contacts) निवडून त्यांच्या नावावर क्लिक करून, त्यांना लोकेशन पाठवू शकता. तसेच लोकेशन शेअर करण्यासाठी शेअरिंग मेन्यूमधील आणखी पर्याय निवडू शकता म्हणजेच… व्हॉट्सअ‍ॅप, आय मेसेज आदींसारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर तुमच्या रिअल टाइम लोकेशनची लिंक शेअर करू शकता. तुमचे लोकेशन शेअर करणे थांबवण्यासाठी, तुम्ही तुमचे लोकेशन शेअर करीत असलेल्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर टॅप करा आणि थांबा हा पर्याय निवडा. एकूणच तुम्ही गूगल मॅप्सच्या या खास फीचरच्या मदतीने तुमचे लोकेशन इतर अनेक सोशल मीडिया अ‍ॅपच्या युजर्सनादेखील सहज पाठवू शकणार आहात