जगभरातील लोक गूगल मॅप्स ही सेवा वापरतात. अनोळखी ठिकाणी पहिल्यांदा प्रवास करताना आपण सगळेच गूगल मॅपचा उपयोग करतो. या ॲपच्या मदतीने ठराविक ठिकाणे, कमी ट्रॅफिक असणारा रस्ता, आजूबाजूचा परिसर यांची माहिती मिळते. त्यामुळे याचा वापर आता जगभरात होऊ लागला आहे, तर कंपनीने अलीकडेच मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासह थेट लाईव्ह लोकेशन शेअर करण्याचे फीचर सादर केलं आहे. हे फीचर लोकेशन ट्रॅकिंगसाठी महत्त्वपूर्ण ठरले आणि वापरकर्त्यांचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला स्मार्टफोन पुन्हा मिळवण्यास मदत करेल.
लाईव्ह लोकेशन तुमच्या डिव्हाइसची (फक्त दोन मीटर अंतरापर्यंत) बॅटरी टक्केवारी आणि इतर माहितीवर रीअल-टाइम प्रवेश प्रदान करते. तुमचा फोन हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर फोनवर कॉल न करता थेट लाईव्ह लोकेशनच्या मदतीने तुम्ही फोन ट्रॅक करू शकता. फक्त तेव्हा तुमच्या डिव्हाइसचे इंटरनेट कनेक्शनसह चालू असणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा…Lava ने भारतात लाँच केला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; फीचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात! किंमत फक्त…
गूगल मॅप्सवरून लाईव्ह लोकेशन कसे शेअर कराल ?
१. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही उपकरणांवर गूगल मॅप्सद्वारे लाईव्ह लोकेशन शेअर करता येते.
२. तुमच्याकडे गूगल मॅप्सचे अपडेटेड व्हर्जन आहे का याची सर्व प्रथम खात्री करा.
३. गूगल मॅप ॲप उघडा.
४. त्यानंतर उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा आणि लोकेशन शेअरिंग हा पर्याय निवडा.
५. तिथे तुम्हाला ‘न्यू शेअर’ असे दिसेल, तिथे क्लिक करा आणि कालावधी (Duration), संपर्क (Contact) किंवा प्लॅटफॉर्मसह तुमचे लोकेशन शेअर करा.
६. लोकेशन शेअर करण्यापूर्वी गूगल मॅप्स ॲपला लोकेशन शेअर करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे.
७. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की, इंटरनेट कनेक्शनसह स्मार्टफोनवरून किंवा लॅपटॉपवरून तुमच्या हरवलेल्या फोनचे लोकेशन ट्रॅक करण्यास मदत होईल
८. अशाप्रकारे तुम्ही गूगल मॅप्सद्वारे तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकता आणि तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन शोधू शकता.
तुमचा फोन हरवला असेल आणि चोराने जर तुमच्या फोनमधील सिमकार्ड काढून टाकले तर मात्र या फीचरचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे, प्रत्यक्ष सिम कार्डऐवजी ई-सिम वापरण्याचा सल्ला दिला जातो आहे. तसेच ज्या वापरकर्त्यांचे गूगल अकाउंट नाही आहे. त्या वापरकर्त्यांना गूगल मॅप लाईव्ह लोकेशन मेसेजिंग ॲपद्वारे शेअर करण्याचा देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लोकेशन शेअरिंग फीचर हे गूगल मॅपवर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले आहे. तसेच व्हॉट्सॲप, ओला, उबर आदी ॲप सुद्धा लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची परवानगी दिली जाते. पण, हे फीचर वापरकर्त्यांसाठी प्रायव्हसी संबंधित चिंता वाढवू शकतात. असे असले तरीही हरवलेला किंवा चोरी केलेला फोन पुन्हा मिळवण्यास फायदेशीर ठरू शकतात .
अँड्रॉइड आणि आयओएस उत्पादक स्मार्टफोन बंद करण्याचा (Power OFF) वापरकर्त्यांसाठी काही खास पर्याय घेऊन येणार आहेत. पॉवर मेनूमध्ये जाण्यासाठी वापरकर्त्यांना बऱ्याचदा की (Key) चा उपयोग करावा लागतो. काहींना फोन लॉक असलेल्या स्थितीत पॉवर मेनू ऑफर करता येत नाही. पण, काही आयफोनचे स्मार्टफोन्स फाईंड माय फीचर्स बंद असताना देखील डिव्हाइसचा मागोवा घेण्यास अनुमती देतात.