Toll Tax On Google Maps:  गुगल हा आपल्या सर्वांच्या जीवनातील अविभाज्य घटक कधीच झाला आहे. गुगल मॅप्सचा वापर प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात केला जातो. कोठेही जायचे असेल तर डायरेक्शनपासून ते अंतर किती आहे हे जाणून घेण्यासाठी याचा वापर केला जातो. गुगल मॅप्सवर तुम्ही एखादे ठिकाण किंवा शॉप देखील सर्च करू शकता. तुम्ही एखाद्या जागेचा देखील यामध्ये समावेश करू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का की या अॅपच्या मदतीने तुम्ही संभाव्य टोल टॅक्स देखील शोधू शकता. आता गुगल मॅपच्या फीचरमुळे (Update Feature) आपल्याला प्रवासादरम्यान किती टोल नाके (Toll Plaza) येतील, तिथं किती टोल भरावा लागेल याची माहिती आधीच युजर्सला मिळणार आहे.

गुगल मॅपवरून टोलची किंमत कशी तपासायची?

गुगल मॅप्समध्ये देण्यात आलेल्या या नवीन फीचरमध्ये रस्त्यात लागणाऱ्या टोल-किंमतीची माहिती दिली जाईल.
गुगल मॅपवर कोणत्याही एका टोलचे दर पाहता येत नाहीत. वास्तविक, Google Maps ठराविक अंतराच्या मध्यभागी येणार्‍या अंदाजे टोल दरांबद्दल सांगतो. उदाहरणासह सांगितले तर गुगल मॅपवर दिल्ली ते आग्रा जाण्यासाठी टोल टॅक्स ४३० रुपये असल्याचे सांगितले जाते. टोल टॅक्स तपासण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घेऊया.

BSE Smallcap News
BSE Smallcap ची १००० अंकांची गटांगळी; ४ महत्त्वाचे घटक जाणून घ्या!
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Google Maps
Google Maps misguides trailer : गुगल मॅप्सने दिला धोका! बाजारातील अरूंद रस्त्यावर घुसला १० चाकी ट्रेलर, ७ तास वाहतूक ठप्प
Google Pixel 9a Feature And Launch Date
Google Pixel 9a खरेदी करणाऱ्यांना ‘या’ ॲपचे मिळणार फ्री सब्स्क्रिप्शन; कधी होणार लाँच? घ्या जाणून…
School bus fares increase by 18 percent
School Bus Fare Hike : ‘स्कूल बस’ची राज्यभर १८ टक्के भाडेवाढ
Flight Rule Of Handbags Indigo Scales Questioned By Passenger After Same Bag Weighs 2 Kg Differently video
“पैसे उकळण्यासाठी काहीही” विमानतळावर होतेय प्रवाशांच्या बॅगांची फसवणूक? VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Who does fact-checking
फॅक्ट चेकिंग नेमकं कोण करतं? फॅक्ट चेकर्स कसे काम करतात? जाणून घ्या सविस्तर….
Viral video young boy sitting on railway track while talking phone video goes viral social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रेल्वे रुळावर फोनवर बोलत बसला; समोरुन ट्रेन आली अन्…VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

(हे ही वाचा : पुन्हा अँटेना येणार! सेट टॉप बॉक्सशिवाय टीव्हीवर मोफत पाहता येणार २०० चॅनल्स, केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत )

टोल टॅक्स ‘असे’ तपासा

१. तुमच्या स्मार्टफोनवर Google Maps उघडा.
२. यानंतर, तुम्हाला कुठे जायचे आहे याची माहिती भरा.
३. आता Direction वर क्लिक करा.
४. यानंतर, मार्ग आणि संभाव्य वेळ खालील स्क्रीनवर दिसेल.
५. संभाव्य वेळेसह जागा वर सरकवा.
६. येथे तुम्हाला मार्गावरील टोल टॅक्सची किंमत वरच्या बाजूला दिसेल.

गुगल मॅपचे फायदे

गुगल मॅप वैशिष्ट्य वापरकर्त्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बऱ्याचदा तुम्ही प्रवासाला निघाल्यावर वाटेत इतके टोल गेट पाहून तुम्हाला आश्चर्य वाटते. त्यामुळे गूगल मॅप तुम्हाला एकूण टोल किती लागतील आणि तुमच्या मार्गावर किती टोल गेट पडतील याची माहिती देण्यास सक्षम असतील, गुगल मॅप्ससह, तुम्ही प्रवास करत असताना तुमच्या जवळील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि दुकाने सहजपणे शोधू शकता. त्यामुळे प्रवास खूप सोपा होतो.

Story img Loader