करोनाकाळात झालेल्या लॉकडाउनमुळे सर्वांना घरून काम करणे बंधनकारक झाले. या काळात सर्व मिटिंग्स, विद्यार्थ्यांचे लेक्चर्स ऑनलाईन गुगल मीटवर घेतले जात असत. आता सर्व काही पुर्ववत झाले असले, तरी अजुनही ऑनलाईन मिटींग्सचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे. ऑनलाईन मिटिंग घेणाऱ्या अशा सर्वांसाठी गुगल मीटने एक भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरचा वापर करून आता गुगल मीटमध्येही इमोजी शेअर करता येणार आहे.
गुगल मीटवर मिटिंग सुरू असताना, त्यामध्ये इमोजी शेअर करता येणार आहे. रिपोर्टनुसार गुगल मीटवर डाव्या बाजूला या इमोजी रीऍक्शन्स दिसतील. या इमोजी कोणी शेअर केल्या आहेत हे देखील युजर्सना जाणून घेता येणार आहे.
आणखी वाचा: गुगल टीव्हीचा रीमोट स्वतःच होणार चार्ज; बॅटरीचीही आवश्यकता नाही, जाणून घ्या कसे करणार काम
यासाह गुगल मीटवर लवकरच ३६०° बॅकग्राउंड फीचर रोलआउट करणार आहे. ज्याचा वापर करून कॅमेराप्रमाणे स्क्रीन देखील रोटेट करणे शक्य होईल. हे फीचर लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिवायसेसवर उपलब्ध होणार आहे.