तुमच्याबाबतीत असे कधी घडले आहे का की तुम्ही सकाळी बाहेर फिरायला गेला आहात आणि अचानक ऑफिसमधून मीटिंगसाठी फोन आला आहे. काही जणांच्या बाबतीत असे होऊ शकते. आपण मीटिंगसाठी शक्यतो गुगल मीटचा वापर करतो. गुगल त्यांच्या व्हिडीओ कॉन्फरसिंग सर्व्हिसमध्ये नवीन आणि उपयोगी अशी फीचर्स आणत असते. आतासुद्धा अशाच एका फीचरवर काम गुगल करत आहे. 9to5Google च्या एका रिपोर्टनुसार, टेक जायंट गुगल नवीन ‘On-the-go’ मोडवर काम करत आहे. जे वापरकर्त्यांना व्हिडीओ कॉलमध्ये अधिक सुरक्षित करेल.

सध्या स्मार्टफोनमध्ये असणारे गुगल Meet वापरकर्ता इंटरफेस सध्या अनेक पर्यायांनी भरलेले आहे. ज्यामुळे चालत असताना किंवा धावत असताना मीटिंग अटेंड करणे अवघड होऊ शकते. अशा ठिकाणी हे नवीन फिचर कामी येणार आहे. गूगल मीटचे ‘ऑन द गो’ मोड डिव्हाईस सेन्सरचा वापर करतो आणि App ला जेव्हा हे लक्षात येते कि वापरकर्ता धावपळीत आहे ते हे फिचर ऑटोमॅटिक सुरू होते.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
pune video
हे काय चाललंय पुण्यात! बेशिस्तपणाचा कळस; थेट फुटपाथवरून चालवताहेत गाड्या, VIDEO होतोय व्हायरल
Mumbai Local Birthday Celebration
‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video
Grandmother dances on pushpa 2 peelings song video viral on social media
काय भारी नाचलीय! ‘पुष्पा-२’ चित्रपटातील गाण्यावर थिरकली आजी, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Pune Video
Pune Video : सावधान! पीएमटीची ऑनलाईन तिकीट चुकूनही फेकू नका; तिकिटावर दिसतोय तुमचा UPI ID आणि मोबाईल नंबर, व्हायरल होतोय व्हिडीओ
Mobile fell into the hot water vessel which was on gas viral video social media
‘या’ कृतीची तिला किंमत मोजावी लागली, जेवण करताना वापरत होती फोन अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं…

हेही वाचा : iPhone आणि Android डिव्हाईसवर वेदर अलर्टस कसे मिळवायचे ? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

गूगल लवकरच मीटमध्ये ऑन द गो नावाचे फिचर देणार आहे. या फीचरची महत्वाची बाब म्हणजे ते फिचर तुमची परिस्थिती समजून घेते आणि मीटिंग सेटिंग्जमध्ये आवश्यक बदल करते. हा पर्याय तुम्हाला मीटिंग जॉईन केल्यानंतर खालील बाजूला असलेल्या तीन डॉट्समध्ये दिसणार आहे. हे फिचर सुरू केल्यानंतर हे तुमचा व्हिडीओ आणि सूर्य सहकार्याचा व्हिडीओ स्ट्रीमिंगला तुमच्यासाठी बंद करेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये लक्ष केंद्रित करू शकता.

तुम्ही जर का धावत आहात किंवा चालत असाल तर मीटिंग जॉईन केल्यानंतर हे फिचर तुम्हाला तुमच्या फोनमधील सेन्सरचा वापर करून ‘ऑन द गो’ मोड सुरू करण्याचा सल्ला देते. तसेच तुम्हाला जेव्हा हवा तेव्हा तुम्ही या मोड बंद करू शकणार आहात. गुगल मीटमध्ये हे फिचर सुरू करताच तुम्हाला एक वेगळा युजर इंटरफेस दिसणार आहे. त्यात तुम्हाला म्यूट, रेंज हॅन्ड आणि ऑडिओसाठी नेहमीपेक्षा मोठे आयकॉन दिसतील. तुम्हाला आवश्यकता असल्या तुम्ही ब्लूटुथ देखील कनेक्ट करू शकता.

Story img Loader