आजकाल एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाबाबत जगभरात मोठ्या गोष्टी घडत आहेत. AI चे नवीन टूल ChatGPT मुळे मानवी जीवन खूप सुकर आणि सोप्या होतील अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. पण AI तंत्रज्ञानावर काम करणारे आणि त्याची निर्मित करणारे जेफ्री हिंटन, ज्यांना जग AI चे गॉडफादर म्हणून ओळखते. त्यांनी या तंत्रज्ञानाचे धोके समजावून सांगत आपल्या कामाबद्दल खंत व्यक्त केली आहे. हिंटन यांनी नुकताच गुगल कंपनीमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, AI बद्दल व्हाईट हाऊसमध्ये एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. ज्यामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय व Anthropic सारख्या कंपन्यांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीबद्दल माहिती देताना व्हाईस हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, या चर्चेत सहभागी झालेल्या कंपन्यांचे अधिकारी हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

हेही वाचा : मोठी बातमी! सॅमसंगने ChatGpt सह ‘हे’ AI चॅटबॉट वापरण्यास कर्मचाऱ्यांवर घातली बंदी, जाणून घ्या काय आहे कारण

दिग्गज टेक कंपन्यांच्या सीईओ यांना व्हाईट हाऊसवर बैठकीसाठी दिलेल्या निमंत्रणामध्ये अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन म्हणाले, ”कंपन्यांनी आपली प्रोडक्ट्स लोकांसाठी उपलब्ध करून देण्याआधी ती पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केली पाहिजे.” वेगाने वाढणाऱ्या AI तंत्रज्ञानाविषयीच्या चिंतेमध्ये गोपनीयतेचे उल्लंघन, पक्षपातीपणा आणि यामुळे घोटाळे आणि चुकीची माहिती मिळू शकते अशा चिंतेच्या गोष्टींचा समावेश होतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी AI बद्दल चिंता व्यक्त केली आहे. बायडेन म्हणाले की, AI समाजासाठी धोकादायक ठरू शकतो. मात्र टेक्नॉलॉजी समाजाला कसे प्रभावित करेल हे पाहणे बाकी आहे. याआधी ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क आणि Apple चे सह-संस्थापक यांनी AI बद्दल चिंता व्यक्त केली होती. मस्क यांनी तर शक्तिशाली AI चा विकास थांबवण्याचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा : Reliance Jio ने लॉन्च केलं ‘हे’ डिव्हाईस, घरबसल्या घेता येणार IPL चा स्टेडियमसारखा आनंद; जाणून घ्या किंमत अन्…

विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील अध्यक्षांच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बायडेन म्हणाले की, त्यांची प्रॉडक्ट्स लोकांसाठी लॉन्च करण्यापूर्वी सुरक्षित आहेत याची खात्री करणे ही टेक कंपन्यांची जबाबदारी आहे. एआय धोकादायक आहे का असे विचारले असता बायडेन म्हणाले ते “पाहायचे बाकी आहे” परंतु “ते धोकादायक असू शकते”. याबाबतचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.

तसेच जो बायडेन पुढे म्हणाले, AI रोग आणि हवामान बदल यासारख्या आव्हानांना तोंड देण्यास मदत करू शकते. मात्र टेक्नॉलॉजीच्या विकसकांनी “आपल्या समाजासाठी, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य जोखीम” पाहणे आणि संबोधित करणे आवश्यक आहे.

Story img Loader