Google paid tribute to jerry lawson : गुगलने आज आधुनिक गेमिंगचे जनक गेराल्ड जेरी लॉसन यांना त्यांच्या ८२ जयंती निमित्त अनोख्या डुडलद्वारे आदरांजली वाहाली. गुगलने त्यांच्या स्मरणार्थ डुडलवर एक परस्परसंवादी गेम सादर केला आहे. अदलाबदल करता येणाऱ्या कार्ट्रिजेससह पहिला घरगुती व्हिडिओ गेम विकसित करणाऱ्या टीमचे नेतृत्व त्यांनी केले होते. गुगलनुसार, लॉसन यांच्या स्मरणार्थ गुगलवर सादर करण्यात आलेला गेम डेव्हियन गुडन, लॉरेन ब्राऊन आणि मोमो पिक्सेल यांनी डिझाइन केला आहे.
लॉसन यांचा जन्म 1 डिसेंबर 1940 रोजी ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे झाला होता. त्यांचा लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्सकडे कल होता. त्यांनी क्विन्स कॉलेज आणि सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतले होते आणि पालो अल्टोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
(७ हजारांच्या आत मिळवा ‘हा’ ३२ इंच टीव्ही, अमेझॉनवर मिळत आहे मोठी सूट)
कॅलिफोर्नियामधील फेअरचाइल्ड व्हिडिओ गेम विभागाचे अभियांत्रिकी आणि विपणन सांचालक म्हणून पदभार सांभाळताना लॉसन यांच्या टीमने फेअरचाइल्ड चॅनल एफ सिस्टिम विकसित केले होते. अदलाबदल करण्यायोग्य कार्ट्रिजेस, ८ वे डिजिटल जॉयस्टिक आणि पॉज मेन्यू असलेले हे पहिले व्हिडिओ गेम होते. चॅनल एफ पुढे अटारी, एसएनईएस, ड्रिमकास्ट आणि इतर अनेक गेमिंग सिस्टिम विकसित करण्यासाठी दिशादर्शक ठरले.
१९८० मध्ये लॉसन यांनी व्हिडिओसॉफ्ट सुरू केले होते. व्हिडिओसॉफ्टने अटारी २६०० सॉफ्टवेअर विकसित केले, ज्यामुळे लॉसन आणि त्यांच्या टीमने तयार केलेली कार्ट्रिज प्रकाशझोतात आली. परंतु, कंपनी ५ वर्षांनंतर बंद पडली. मात्र, लॉसन यांनी आपल्या कर्तुत्वातून उद्योगक्षेत्रात एक मोठा ठसा उमटवला होता.
(PAYTM : एलपीजी गॅस बुकिंगवर पेटीएम देतंय कॅशबॅक, असा घ्या लाभ)
लॉसन यांची कामगिरी न्यूयॉर्कमधील रॉचेस्टर येथील वर्ल्ड व्हिडिओ गेम हॉल ऑफ फेममध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. लॉसन यांना २०११ मध्ये इंटरनॅशनल गेम डेव्हलपर्स असोसिएशनने इंडस्ट्री ट्रेलब्लेझर म्हणून सन्मानित केले होते.