गुगल पे वापरकर्त्यांसाठी अचानक एक सुखद धक्का बसला. गुगल पेने अचानक आपल्या वापरकर्त्यांच्या खात्यावर कॅश बॅगच्या स्वरुपात जवळपास ८०,००० रुपये पाठवले. अशाप्रकारे पैसे आलेले पाहून अनेकांना आनंद झाला. मात्र, हा आनंद फार कमी काळ टिकला. गुगल पेच्या एका तांत्रिक चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

गुगल पेच्या तांत्रिक चुकीमुळे अचानक तब्बल ८० हजार रुपये विविध लोकांच्या बँक खात्यावर जमा झाले. यानंतर ज्यांच्या खात्यावर अचानकपणे हे पैसे जमा झाले त्यांना सुखद धक्का बसला. त्यांना कॅशबॅक स्वरुपात रिवार्डमध्ये हे पैसे आलेले दिसले. अनेकांना तर हे पैसे आपल्याला का मिळाले हेही कळाले नाही.

पत्रकार मिशाल रहमान यांनी याबाबत ट्वीट केलं. ते म्हणाले, “सध्या गुगल पे वापरकर्त्यांना मोफत पैसे देत आहे असं वाटतं. मी गुगल पे उघडलं आणि रिवार्ड्समध्ये मला ३ हजार ७७१ रुपये आल्याचं दिसलं.”

हेही वाचा : Google Layoffs: कर्मचारी कपातीविरोधात लंडनमधील कर्मचाऱ्यांचे वॉकआऊट; युनाइटचे ​​अधिकारी मॅट व्हेली म्हणाले, “जोपर्यंत गुगल…”

असं असलं तरी अचानक कारण नसताना मिळालेल्या या पैशांचा आनंद काही काळासाठीचाच ठरला. गुगल पेच्या तांत्रिक विभागाला ही चूक लगेच लक्षात आली आणि त्यांनी जमा केलेले पैसे पुन्हा परत घेतले.

गुगलकडून आलेले पैसे खर्च केले त्यांचं काय?

गुगलने आपल्या खात्यावर पैसे जमा केल्यानंतर काही वापरकर्त्यांनी लगोलग हे पैसे वापरले. त्यामुळे गुगलच्या तांत्रिक चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा पैसे घेताना काही जणांच्या खात्यावर पैसेच नव्हते. अशा युजर्सला गुगल पेने एक ईमेल पाठवला. यात त्यांनी तुम्हाला खात्यावर आलेले पैसे परत करणं शक्य नसेल, तर ते पैसे तुमचे आहेत, असं म्हटलं. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असंही स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pay deposit 80 thousand rupees due to technical error know what happened pbs
Show comments