Google Pay ने अखेर आपली UPI LITE सेवा आपल्या प्लॅटफॉर्मवर सादर केली आहे. या फीचरमुळे लहान किंमतीचे पेमेंट करणे वेगवान आणि सोपे होणार आहे. युपीआय लाईट एक डिजिटल पेमेंट सेवा आहे जिला नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे डिझाईन करण्यात आली आहे. युपीआय लाईट फीचर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर २०२२ मध्ये लॉन्च केले आहे. युपीआय लाईट फिचर गुगल पे ने सुरु केल्यामुळे वापरकर्ते पिन न टाकता आपल्या अकाउंटमधून एका क्लिकवर २०० रुपये ट्रान्स्फर करण्याची परवानगी देते. किराणा सामान, नाश्ता आणि कॅब राईड यांसारख्या दैनंदिन गरजांसाठी झटपट पेमेंट करण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरते.

युपीआय लाईट फिचर आता प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याचे गुगल पे चे म्हणणे आहे. या फीचरच्या मदतीने कंपनीचे लक्ष्य डिजिटल पेमेंट सोपे, वेगवान आणि विश्वासार्ह बनवण्याचे आहे. हे फिचर गुगल पे वॉर रोलआऊट करण्यात आले आहे. जे वापरकर्त्यांना पिनचा वापर न करता वेगवान आणि एका क्लिकवर पेमेंट करण्यास सक्षम बनवते. हे फिचर वापरकर्त्याच्या बँक अकाउंटशी जोडलेले असेल. परंतु रिअल-टाइममध्ये जारी करणार्‍या बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर अवलंबून राहणार नाही. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात

हेही वाचा : Flipkart Big Saving Day Sale 2023: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ‘या’ आयफोनवर मिळणार डिस्काउंट; कधीपासून सुरू होणार सेल?

युपीआय लाईट फीचरमध्ये दिवसातून दोन वेळा २ हजार रुपयांपर्यंतची रक्कम ऍड करता येऊ शकते. तसेच हे फिचर वापरकर्त्यांना २०० रुपयांपर्यंत UPI व्यवहार करण्याची परवानगी देते.

पेटीएम आणि फोन पे या दोन प्लॅटफॉर्म जे गुगल पे चे प्रतिस्पर्धी समजले जातात त्यांनी त्याच्या प्लॅटफॉर्मवर हेच फिचर आणल्यानंतर गुगल पे ने काही दिवसांमध्येच युपीआय लाईट लॉन्च केले आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत १५ बँकांनी युपीआय लाईटचे समर्थन केले आहे. आगामी काही काळामध्ये आणखी बँका याचे समर्थन करू शकतात.

हेही वाचा : Tata Play Fiber च्या प्लॅन्समध्ये मिळतात १०० Mbps सह तब्बल ‘या’ २२ OTT प्लॅटफॉर्मचे फायदे, किंमत…

युपीआय लाईट फिचर रोल आऊट केल्याबद्दल गुगल पे चे उपाध्यक्ष Ambarish Kenghe म्हणाले, ”गुगल पे मध्ये युपीआयची उपयुक्तता वाढवण्यासाठी NPCI आणि आरबीआयसह भारत सरकारसह भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. देशामध्ये डिजिटल पेमेंटला अधिक सोपे करण्यासाठी हे महत्वाचे आहे. प्लॅटफॉर्मवर युपीआय लाईट फीचरच्या सुरुवातीसह आमचे लक्ष्य वापरकर्त्यांना सोयीस्कर, कॉम्पॅक्ट आणि सुपरफास्ट पेमेंट्सचा अनुभव पोहोचवण्यासाठी मदत करून लहान-मूल्याचे व्यवहार सुलभ करण्याचे आमचे ध्येय आहे.”