Back to Google For AI : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय. लहान-मोठ्या उद्योजकांपासून बलाढ्य राष्ट्रांपर्यंत सर्वच जण या नव्या तंत्रज्ञानाकडे कुतूहलानं आणि सावधपणे पाहत आहेत. याचदरम्यान गूगलने एक मोठं पाऊल उचललं आहे. AI तंत्रज्ञान बनविण्यासाठी त्यांनी एका एक्स कर्मचाऱ्याला परत घ्यायचं ठरवलं आहे आणि त्याला परत घेण्यासाठी कोटींचा खर्च केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोआम शाझीर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. त्यानं २०२१ मध्ये गूगल सोडलं. त्याचं कारण म्हणजे त्यानं तयार केलेल्या चॅटबॉटच्या रिलीजबाबत गूगलच्या व्यवस्थापनाशी झालेले मतभेद. पण, आता एक धक्कादायक बाब समोर येत आहे. कारण- गूगलनं नोआम शाझीरला परत बोलावलं आहे आणि त्यासाठी त्यांनी २.७ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. ही एक प्रचंड रकम आहे. शाझीरची कंपनी गूगलनं खरेदी केली आहे. त्यामुळे गूगलला AI च्या क्षेत्रात आणखी ताकद मिळेल आणि शाझीरच्या कौशल्यांचा फायदा घेता येईल. हा करार टेक्नॉलॉजी लायसेन्सिंग डील म्हणून सादर केला गेला, नोआम शाझीर गूगल कंपनीच्या नेक्स्ट जनरेशन एआय तंत्रज्ञानाच्या विकासाचं नेतृत्व करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, शाझीरच्या ज्ञानाचा उपयोग करून गूगल नवीन AI तंत्रज्ञान तयार करणार आहे.

हेही वाचा…आता वेगाने व्हायरल होणार तुमची रील! ६० सेकंद नव्हे, बनवा ३ मिनिटांचे YouTube Shorts; समजून घ्या, नवीन अपडेटमध्ये होणार ‘हे’ तीन बदल

एआय डिबेट (AI debate) :

आता टेक्नॉलॉजीच्या जगात AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जात आहेत. काही लोकांच्या मते, या AI च्या विकासासाठी कंपन्या खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करीत आहेत आणि हे योग्य आहे का? यावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत विविध दृष्टिकोन आहेत आणि त्यामुळे संपूर्ण टेक्नॉलजी क्षेत्रात एक स्पर्धा निर्माण झाली आहे.

२१ वर्षांपूर्वी सोडली गूगलची साथ :

२०१७ मध्ये शाझीरनं गूगलचा सहकारी डॅनियल डी फ्रिटाससोबत एक चॅटबॉट तयार करण्यासाठी एकत्र काम केलं. या चॅटबॉटचे नाव प्रथम ‘मीना’ असे ठेवण्यात आले. हा अनेक विषयांवर आत्मविश्वासानं संवाद साधू शकत होता. मीना इट्स द वर्ल्ड या नावाच्या एका प्रसिद्ध मेमोमध्ये शाझीरनं भविष्यवाणी केली की, हा चॅटबॉट गूगलच्या सर्च इंजिनाला बदलू शकतो आणि ट्रिलियन्स डॉलर्सचं उत्पन्न निर्माण करू शकतो.

म्हणूनच गूगलने चॅटबॉट सार्वजनिकपणे रिलीज केला नाही. कारण- त्यांना सुरक्षेबद्दल चिंता वाटत होती. त्यामुळे शाझीर आणि डी फ्रिटास यांनी २०२१ मध्ये ‘कॅरेक्टर’ सुरू करण्यासाठी कंपनी सोडली. “एआयच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या धाडसाची कमतरता असल्याचं जाणवून, शाझीरनं Character.AI सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा दृष्टिकोन असा होता की, एक चॅटबॉट तयार करावा; जो एकाकीपणा किंवा डिप्रेशनचा सामना करणाऱ्यांना मदत करील. मात्र, या कंपनीला स्थापित दिग्गज कंपन्यांशी स्पर्धा करणं आणि एआय विकासाशी संबंधित उच्च खर्चांवर मात करणं खूप कठीण झालं,” असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पण, आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कंपनी पुन्हा एकदा या कर्मचाऱ्याला परत घेत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pays old employee noam shazeer 2 point 7 billion dollars leading to this big debate on overspending on ai asp