२०२१ वर्षाअखेरीस गुगल फोटो अ‍ॅपमध्ये एक नवीन अपडेट दिलं आहे. गुगल फोटो अ‍ॅप युजर्संना नवीन अपडेटसह वापरता येणार आहेत. फिचर्स लिस्टमध्ये पीपल अँड पेट्स विजेट्ससह सिनेमॅटिक फोटो आणि इव्हेंट मेमरीज यांचा समावेश आहे. हे फिचर्स अॅप अपडेट केल्यानंतर युजर्ससाठी उपलब्ध होईल. गुगलने सिनेमॅटिक फोटो फीचर एक वर्षापूर्वी आणले होते आणि आठवणींना उजाळा देणारं एक माध्यम म्हणून वर्णन केले होते. गुगल फोटोजमध्ये आधीपासून मेमरी विजेट फिचर्स आहे. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांवर उपलब्ध आहे, यामुळे युजर्संना त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मार्टफोनच्या होम स्क्रीनवर पाहता येतात. नवीन विजेटसह, युजर्संना प्रदर्शित केलेल्या फोटोंवर अधिक चांगले नियंत्रण दिले गेले आहे. ते होमस्क्रिनवर कोणाचे चित्र असावे हे निवडण्यास सक्षम असतील. नवं फिचरर फक्त अँड्राइड युजर्ससाठी असणार आहे आणि लवकरच इतर युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.

२०२१ च्या सर्वोत्कृष्ट आठवणी संग्रहामध्ये युजर्संनी मागील १२ महिन्यांत क्लिक केलेल्या फोटोंचा समावेश असेल. फोटोंचा बॅकअप देखील गुगलवर अपलोड केला जात आहे. गुगल आपल्या वापरकर्त्यांना गुगल फोटोजमध्ये सेव्ह केलेल्या फोटोंची सर्वोत्तम टाइमलाइन दाखवेल.

गुगलने मे २०१५ मध्ये त्यांची फोटो अ‍ॅप सेवा सुरू केली होती. युजर्संना त्यांचे फोटो क्लाउडमध्ये सेव्ह करण्याचा एक सोपा पर्याय आहे. गुगल फोटोज अॅप अँड्राइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर आहे. तसेच विंडोज आणि मॅकसारखे युजर्सदेखील जतन केलेले फोटो पाहू शकतात. ऑपरेटिंग सिस्टममध्ये गुगल फोटोज ही सेवा वाय-फाय उपलब्ध असताना क्लाउडवर मीडिया फाइल अपलोड करते.

Story img Loader