२०२१ वर्षाअखेरीस गुगल फोटो अॅपमध्ये एक नवीन अपडेट दिलं आहे. गुगल फोटो अॅप युजर्संना नवीन अपडेटसह वापरता येणार आहेत. फिचर्स लिस्टमध्ये पीपल अँड पेट्स विजेट्ससह सिनेमॅटिक फोटो आणि इव्हेंट मेमरीज यांचा समावेश आहे. हे फिचर्स अॅप अपडेट केल्यानंतर युजर्ससाठी उपलब्ध होईल. गुगलने सिनेमॅटिक फोटो फीचर एक वर्षापूर्वी आणले होते आणि आठवणींना उजाळा देणारं एक माध्यम म्हणून वर्णन केले होते. गुगल फोटोजमध्ये आधीपासून मेमरी विजेट फिचर्स आहे. अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांवर उपलब्ध आहे, यामुळे युजर्संना त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मार्टफोनच्या होम स्क्रीनवर पाहता येतात. नवीन विजेटसह, युजर्संना प्रदर्शित केलेल्या फोटोंवर अधिक चांगले नियंत्रण दिले गेले आहे. ते होमस्क्रिनवर कोणाचे चित्र असावे हे निवडण्यास सक्षम असतील. नवं फिचरर फक्त अँड्राइड युजर्ससाठी असणार आहे आणि लवकरच इतर युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
गुगल फोटोजमध्ये नवं फिचर्स; सिनेमॅटिक मोडपासून पीपल अँड पेट्स विजेट्सचा समावेश
२०२१ वर्षाअखेरीस गुगल फोटो अॅपमध्ये एक नवीन अपडेट दिलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-12-2021 at 15:37 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google photos is introducing new and improved features rmt