गुगल ही दिग्गज टेक कंपनी आहे. गुगलने आपल्या पुढील जनरेशनमधील फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 8 सिरिजच्या अधिकृत लॉन्चिंगची तारीख जाहीर केली आहे. आयफोन १५ सिरीज लॉन्च होण्यासाठी अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत. Apple या मोठ्या लॉन्च इव्हेंटच्या आधी गुगलच्या एका फ्लॅगशिप स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टवर गुगल पिक्सेल ७ प्रो मोठ्या डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी खरेदीदारांना आहे. गुगल पिक्सेल ७ प्रो हा मागच्या वर्षी गुगल पिक्सेल ७ सह लॉन्च झाला होता. पिक्सेल ७ प्रो ने पिक्सेल ६ ची जागा घेतली आहे. जो भारतात अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध नव्हता.

गुगल पिक्सेल ७ प्रो मधेय १४४०x ३१२० पिक्सेल रिझोल्युशन आणि १२० Hz रिफ्रेश रेट असलेला ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले LTPO QHD+ AMOLED प्रकारचा डिस्प्ले आहे. हुड अंतर्गत या फोनमध्ये Tensor G2 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला असून, यात १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वापरकर्त्यांना मिळते. हा फोन अँड्रॉइड १३ वर चालतो. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Emotional video Due to high rates of ambulance father took son from his bike viral video
कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO
Samsung Galaxy S25 Series Launch In India
Samsung Galaxy S25 : सॅमसंगचा पॉवरफूल स्मार्टफोन होणार ‘या’ तारखेला लाँच! कशी करायची प्री-बुकिंग? जाणून घ्या…
Shocking accident video five people crushed by young man learning to drive two in critical condition the incident was caught on cctv
बापरे! कार चालवायला शिकणाऱ्या तरुणाने पाच जणांना चिरडले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क
Kia Syros Bookings Start Tonight
Kia Syros : थ्री इंजिन पर्याय, ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स अन् बरेच काही; टोकन रक्कम भरून आजच बुक करा ‘ही’ एसयूव्ही
ncpi google pay phonepe loksatta
‘एनसीपीआय’कडून ‘गूगलपे’ आणि ‘फोनपे’ला कोणता दिलासा? याच दोन कंपन्यांची डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात मक्तेदारी का?

हेही वाचा : VIDEO: प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी लॉन्च होणार Google Pixel 8 सिरीज, जाणून घ्या

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास गुगल पिक्सेल ७ प्रो मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप येतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ४८ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेऱ्याचा समावेश आहे. यात १०.८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये ४.९२६ mAh क्षमतेच्या बॅटरीसह ३०W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

काय आहेत ऑफर्स ?

लॉन्चिंगच्या वेळी गुगल पिक्सेल ७ प्रो ची किंमत ८४,९९९ रुपये होती. तथापि आयफोन १५ सिरीज लॉन्च होण्यापूर्वी गुगल पिक्सेल ७ प्रो ५०,५०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ २०,४९९ रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर सध्या गुगल पिक्सेल ७ प्रो ची किंमत ७०,९९९ रुपये इतकी आहे. HDFC डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना यावर ५०० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे या फोनची किंमत ७०,४९९ रुपये इतकी होते. या शिवाय तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला गुगल पिक्सेल ७ प्रो वर ५० हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. सर्व बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्ससह तुम्ही गुगल पिक्सेल ७ प्रो केवळ २०,४९९ रुपयांमध्ये फ्लिपकार्टच्या सेलमधून खरेदी करू शकता.

Story img Loader