गुगल या दिग्गज टेक कंपनीचा काल मेड बाय गुगल २०२३ हार्डवेअर लॉन्च इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये गुगलने आपली नवीन सिरीज लॉन्च केली आहे. कंपनीने गुगल पिक्सेल ८ सिरीज लॉन्च केली. ज्यात पिक्सेल आणि पिक्सेल ८ प्रो या दोन फोन्सचा समावेश आहे. गुगल पिक्सेल ८ सिरीज भारतात लॉन्च झाल्यानंतर गुगल पिक्सेल 7a, गुगल पिक्सेल ७ आणि गुगल पिक्सेल प्रो च्या किंमत कमी झाल्या आहेत. गुगल पिक्सेलची विक्री भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाते. फ्लिपकार्टवर ८ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. या सेल दरम्यान अनेक डिव्हाइसवर आकर्षक डिस्काउंट खरेदीदारांना मिळणार आहे. तथापि, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये गुगल पिक्सेल 7a कमी किंमतीत उपलब्ध आहे. तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

गुगल पिक्सेल 7a : फीचर्स

गुगल पिक्सेल 7a च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.१ इंचाचा फुल्ल एचडी + AMOLED डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. हूड अंतर्गत, या फोनमध्ये पिक्सेल ७ आणि पिक्सेल ७ प्रो प्रमाणेच Tensor G2 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ६४ मेगापिक्सलचा सोनी IMX787 सेन्सर आणि १३ मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड सेन्सरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. व्हिडीओ आणि सेल्फीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
How To Use Super Coins For Free OTT Subscription
Flipkart: फ्लिपकार्टवरून मोफत OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Little school girl driving jcb as passion video viral on social media dvr 99
लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Emotional video Due to high rates of ambulance father took son from his bike viral video
कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO

हेही वाचा : Google Pixel 8 Series लॉन्च; ‘या’ मॉडेलची किंमत आहे आयफोन 15 एवढी, फीचर्स एकदा बघाच

सध्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलच्या आधी गुगल पिक्सेल 7a कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहे. गुगल पिक्सेल 7a भारतात ४३,९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. तथापि, फ्लिपकार्टवर तुम्ही पिक्सेल 7a हा फोन ३९,२९९ रुपयांच्या डिस्काउंटनंतर केवळ ४,७०० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. गुगल पिक्सेल 7a ची फ्लिपकार्टवरील सध्याची किंमत ४३,९९९ रुपये आहे. तसेच फ्लिपकार्ट खरेदीदार Axix बँकेच्या कार्डवर ५ टक्क्यांचा कॅशबॅक मिळवू शकतात. ज्यामुळे या फोनची किंमत ४१,८०० रुपयांपर्यंत कमी होईल. याशिवाय तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला गुगल पिक्सेल 7a वर ३७,१०० रुपयांची सूट मिळू शकते. यामुळे तुम्ही हा फोन केवळ ४,०० रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Story img Loader