Google pixel 7a स्मार्टफोनबाबत एक नवीन माहिती लिक झाली आहे. टिप्सटर ऑनलिक्सनुसार, पिक्सेल ७ ए हा फोन पिक्सेल ७ सिरीजमधील फोन्स सारखाच दिसण्याची शक्यता आहे. परंतु, त्यामध्ये तळाशी किंचित जाड बेझेल आणि मोठी हनुवटी मिळू शकते. पिक्सेल ७ ए मध्ये नवीनच लाँच झालेले जी २ चिपसेट मिळू शकते. फोन प्लास्टिक फिनिशसह सादर केला जाऊ शकतो,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑनलिक्सने केलेल्या ट्विटनुसार, पिक्सेल ७ ए हा फोन पिक्सेल ६ ए स्मार्टफोनच्या तुलनेत किंचित जाड असू शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला Kuba Wojciechowski नावाच्या टिपस्टरनेही या फोनबाबत काही खुलासे केले होते.

(शाओमीने Mi 11 Lite च्या किंमतीत केली कपात, १० हजारांची बचत, ६४ एमपी कॅमेऱ्यासह मिळतंय बरंच काही)

टिपस्टर कुबानुसार, पिक्सेल ७ ए स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्झ स्क्रिन आणि सोनी आयएमएक्स ७८७ आणि सोनी आयएमएक्स १२ सेन्सरसह नवीन ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. या फोनमध्ये ५ वॉट वायरलेस चार्जिंग फीचर मिळण्याची देखील शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी लाँच केले होते पिक्सेल ७ आणि पिक्सेल ७ प्रो

काही महिन्यांपूर्वी गुगलने पिक्सेल ७ आणि पिक्सेल ७ प्रो स्मार्टफोन लाँच केले होते. या स्मार्टफोन्समध्ये अडथळारहित कार्य होण्यासाठी टेन्सर जी २ चिपसेट देण्यात आले आहे. दोन्ही फोन्स अँड्रॉइड १३ वर चालतात. कंपनीने या फोन्समध्ये क्लिअर कॉलिंग, गाइडेड फ्रेम आणि इतर काही विशिष्ट फीचर्स दिले आहत. आता कंपनी ग्राहकांसाठी पिक्सेल ७ ए उपलब्ध करण्याची शक्यता आहे. या फोनबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pixel 7a renders leaked online check pics ssb