Google ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. तसेच गुगल हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गुगल लवकरच आपली Pixel 8 सिरीज लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर ही सिरीज लॉन्च होईल अशी शक्यता आहे. टिपस्टर योगेश ब्रार यांच्या मतानुसार, Pixel 8 सिरीज या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च होऊ शकते. तसेच टिपस्टरने आगामी पिक्सेल ८ प्रो हॅन्डसेटचे मुख्य डिटेल्स उघड केले आहेत. गुगल पिक्सेल ८ सिरीजमध्ये Pixel 8 आणि Pixel 8 Pro या दोन फोन्सचा समावेश असू शकतो.

Google Pixel 8 सिरीज: अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

टिपस्टर योगेश ब्रार यांच्या मते, Google Pixel 8 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा QHD+ LTPO OLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका असू शकतो. हे Google Tensor G3 चिपसेट आणि टायटन चिपद्वारे समर्थित असेल अशी अपेक्षा आहे. तसेच यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज पर्याय असू शकतो. तसेच यात अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे.

Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar reached in Nepal for movie shooting
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

हेही वाचा : iPhone 15 लॉन्च होण्यापूर्वी ‘या’ प्लॅटफॉर्मवर मिळतोय आयफोन १३ आणि १४ सिरीजवर भरघोस डिस्काउंट

फोटोग्राफीसाठी गुगल पिक्सल ८ प्रो मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यामध्ये OIS चा सपोर्ट असणारा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ६४ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि ४८ मेगापिक्सल टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी ११ मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. स्मार्टफोन नवीन तापमान सेन्सरसह येण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : Phone Pe चा मोठा निर्णय! यापुढे पेमेंट होताच ऐकू येणार मराठी आवाज

पिक्सल ८ प्रो अँड्रॉइड १४ वर आधारित असण्याची शक्यता आहे. तसेच चार्जिंगसाठी ४,९५० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला २७W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

Google Pixel 8: अपेक्षित किंमत

दुसऱ्या ट्विटमध्ये टिपस्टर योगेश ब्रार यांनी खुलासा केला की, Pixel 8 ची किंमत $६४९ (अंदाजे ५३,४५० रुपये ) किंवा $६९९(अंदाजे ५७,७५० रुपये ) असू शकते. उल्लेखनीय म्हणजे, Pixel 7 भारतात ५९,९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे Pixel 8 भारतात ६०,००० रुपयांच्या आत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, Pixel 8 Pro चे कोणतेही डिटेल्स सध्या ऑनलाइन उपलब्ध नाहीत. Pixel 7 Pro भारतात ८४,९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. लवकरच स्मार्टफोनची अधिकृत किंमत जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.