गुगल या दिग्गज टेक कंपनीने मागील आठवड्यात झालेल्या आपल्या मेड बाय गुगल २०२३ हार्डवेअर लॉन्च इव्हेंटमध्ये गुगल पिक्सेल ८ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. गुगलच्या या फोनमध्ये Tensor G3 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. गुगल पिक्सेल ८ हा फोन लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये ६.२ इंचाची स्क्रीन तसेच याला १२० Hz इतका रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. पिक्सेल ८ हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना १२८ जीबी आणि २५६ जीबी असे दोन स्टोरेज पर्याय मिळणार आहेत. फोनचंही प्री-ऑर्डर ५ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.

आज दुपारी १२ वाजल्यापासून गुगल पिक्सेल ८ ची विक्री सुरु झाली आहे. गुगल पिक्सेल ८ हा फोन ७५,९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची किंमत आधीच्या फोनच्या किंमतीपेक्षा जास्त आहे. याआधीच गुगल पिक्सेल ७ हा फोन ५९,९९९ रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला होता.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
Puneri pati in outside temple for couples funny photo goes viral on social media
PHOTO: “प्रेमी युगुलांना इशारा…” मंदिराबाहेर लावली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून पोट धरुन हसाल
check your PF balance instantly without UAN Number
EPF missed call service: UAN नंबरशिवाय तपासू शकता PF बॅलेन्स, जाणून घ्या सोपी पद्धत

हेही वाचा : Google Pixel 8 Series लॉन्च; ‘या’ मॉडेलची किंमत आहे आयफोन 15 एवढी, फीचर्स एकदा बघाच

Google Pixel 8: स्पेसिफिकेशन्स

गुगल पिक्सेल ८ फोनमध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १४ आऊट ऑफ बॉक्सवर चालतो. पिक्सेल ८ मध्ये वापरकर्त्यांना ६.२ इंचाचा फुल एचडी + OLED डिस्प्ले मिळतो. पिक्सेल ८ मध्ये ८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅम देण्यात आली आहे. पिक्सेल ८ स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.68 अपर्चर असणारे सॅमसंग GN2 सेन्सर देण्यात आला आहे. पिक्सेल ८ मध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगलचा कॅमेरा, सोनीचा IMX386 सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओसाठी फोनमध्ये ११ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पिक्सेल ८ मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय , ५जी, ४जी एलटीई, ब्लूटूथ ५.३ , जीपीएस, एनएफसी आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट असे फिचर देण्यात आले आहेत. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळणार आहे. पिक्सेल ८ मध्ये २७ W वायर्ड चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये ४५७५ mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. पिक्सेल ८ मध्ये ५० टक्के चार्ज होण्यासाठी थोडा जास्त कालावधी लागू शकतो.

गुगल पिक्सेल ८ : फ्लिपकार्ट ऑफर

गुगल पिक्सेल ८ ची विक्री आज दुपारी १२ वाजल्यापासून सुरू झाली आहे. जसे की आपण पहिलेच की हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तुम्ही हा फोन Hazel, Obsidian आणि Rose या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता. फोनच्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७५,९९९ रुपये आहे. तथापि,या फोनवर फ्लिपकार्ट ८ हजारांचा बँक डिस्काउंट देत आहे. ही बँक ऑफर आयसीआयसीआय , कोटक महिंद्रा आणि अ‍ॅक्सिक्स बँकेच्या ग्राहकांसाठी आहे. जर का तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला ३ हजारांची अतिरिक्त सूट मिळू शकते. या सर्व ऑफर्समुळे गुगल पिक्सेल ८ ची किंमत ६४,९९९ रुपये इतकी कमी होते.