सध्या अनेक मोबाइल उत्पादक कंपन्या आपले नवनवीन स्मार्टफोन्स भारतीय बाजारामध्ये लॉन्च करत आहेत. नुकतेच गुगलने आपली पिक्सेल ८ सिरीज व अ‍ॅपल कंपनीने आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. गुगल पिक्सेल ८ सिरीजमध्ये गुगल पिक्सेल ८ आणि गुल पिक्सेल ८ प्रो या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. तर आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५ , आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो प्लस या मॉडेल्सचा समावेश आहे. आज आपण गुगल पिक्सेल ८ आणि आयफोन १५ या दोन फोनमधील तुलना जाणून घेणार आहोत. दोन्ही फोनचे फीचर्स, किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिझाइन आणि डिस्प्ले

गुगल पिक्सेल ८ मध्ये ६.२ इंचाचा OLED डिस्प्ले मिळतो.या डिस्पेलचा रिफ्रेश रेट १२० Hz इतका आहे. तर आयफोन १५ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले वापरकर्त्यांना मिळतो. आयफोन १५ मध्ये डायनॅमिक आयर्लंडची सुविधा देण्यात आली आहे. पिक्सेल ८ मध्ये आणि आयफोन १५ या दोन्ही फोन्सच्या डिस्प्लेमध्ये २००० नीट्स इतका ब्राइटनेस देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : Google Pixel 8 Series लॉन्च; ‘या’ मॉडेलची किंमत आहे आयफोन 15 एवढी, फीचर्स एकदा बघाच

कॅमेरा

पिक्सेल ८ फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.68 अपर्चर असणारे सॅमसंग GN2 सेन्सर देण्यात आला आहे. पिक्सेल ८ मध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगलचा कॅमेरा, सोनीचा IMX386 सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओसाठी फोनमध्ये ११ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. आयफोन १५ मध्ये गुगलच्या फोनप्रमाणे AI चा सपोर्ट देण्यात आलेला नाही. यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आली आहे.

बॅटरी आणि किंमत

गुगल पिक्सेल ८ मध्ये ४,५७५ mAh क्षमतेची बॅटरी मिळते. तसेच यामध्ये २७ W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. गुगल पिक्सेल ८ ची किंमत ७५,९९९ रुपये व आयफोन १५ ची किंमत ७९,९०० रुपये इतकी आहे. गुगल पिक्सेल ८ मध्ये आयफन १५ पेक्षा अधिक जास्त क्षमतेची बॅटरी मिळते. तर आयफोन १५ मध्ये ३,३४९ mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये देखील २७ W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google pixel 8 vs iphone 15 battery price camera 50 mp and 48 mp performance comparison tmb 01