Google Pixel 9a Sale In India : गुगलने भारतीय बाजारात पिक्सेल ९ए ची विक्री तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. हा स्मार्टफोन १६ एप्रिलपासून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे, ज्यामध्ये काही लाँच ऑफर्स आहेत, ज्यात ३,००० रुपयांची बँक सूट देखील समाविष्ट आहे. तर भारतात पिक्सेल ९ ए (Pixel 9a) ची किंमत काय असेल, त्याचे फीचर्स काय असणार आहेत आणि या स्मार्टफोनसाठी ऑफर असणार आहेत का याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…

स्मार्टफोनसाठी सेल १६ एप्रिलपासूनच सुरु होईल आणि तुम्ही फ्लिपकार्ट आणि प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून हा फोन खरेदी करू शकता. तसेच ४९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, निवडक बँक कार्डवर ग्राहकांना ३,००० रुपयांची सूट मिळणार आहे. गुगलने ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह एकाच व्हेरिएंटमध्ये पिक्सेल ९ए लाँच केला आहे. हा फोन अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. पण, भारतात तो केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे.

पिक्सेल ९ ए (Google Pixel 9a) चे फीचर्स :

गुगलने परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम फीचर्ससह नवीन Pixel 9a लाँच केला आहे. नवीन सादर केलेल्या फोनमध्ये तुम्हाला पुढील फीचर्स दिले जातील…

या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले आहे जो १२०Hz चा रिफ्रेश रेट देतो. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन आहे. गुगल टेन्सर G4 चिपसेट, सुरक्षेसाठी, टायटन M2 सिक्युरिटी चिप दिला आहे. तसेच स्मार्टफोन हँडसेट अँड्रॉइड १५ वर चालतो. पिक्सेल ९ए मध्ये ७ वर्षांचे ओएस अपडेट्स आणि जबरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो, ज्यामध्ये ४८MP प्रायमरी शूटर, १३MP अल्ट्रावाइड शूटर, एआय-एनहान्स्ड फोटोग्राफी नाईट मोड आणि रिअल टोन फीचर्सने सुद्धा देण्यात आले आहेत. या डिव्हाइसमध्ये जलद चार्जिंगसह दीर्घ बॅटरी लाइफ आहे, कारण या डिव्हाइसला ५१००mAh बॅटरीला सपोर्ट आहे, जी दिवसभर वापरण्यासाठी उपयोगी पडू शकते. तसेच हे २३W जलद चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

याव्यतिरिक्त पिक्सेल ९ए मध्ये गुगलचा टेन्सर जी४ प्रोसेसर, प्रीमियम ओएलईडी डिस्प्ले, लॉन्ग सॉफ्टवेअर सपोर्ट सारख्या फ्लॅगशिप-लेव्हल फीचर्स तुलनेने परवडणाऱ्या किमतीत मिळतात. बँक डिस्काउंट, पॉवरफुल कॅमेरा सेटअप आणि गुळगुळीत १२० हर्ट्झ डिस्प्लेसह, दीर्घकालीन सॉफ्टवेअर अपडेट्ससह प्युअर अँड्रॉइड अनुभव शोधणाऱ्यांसाठी हा स्मार्टफोन एक उत्तम पर्याय आहे.