Google Pixel 9a Offers Free You Tube Premium : गूगल पिक्सेल ९ सीरिज तिच्या नवीन डिझाइन, पॉवरफूल परफॉर्मन्स व कॅमेरा फीचर्ससाठी भारतात लोकप्रिय आहे. फ्लॅगशिप मॉडेल्समुळे खरेदीदारांच्या मनावर आधीच मोठा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आता कंपनी परवडणारा स्मार्टफोन, Pixel 9a जागतिक मार्केटमध्ये लाँच करणार आहे. Pixel 9 सीरिज लवकर रिलीज केल्यामुळे गूगल पिक्सेल ९ ए (Google Pixel 9a) मार्च महिन्याच्या सुरुवातीला लाँच होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर Pixel 9a युजर्स यूट्यूब प्रीमियम (You Tube Premium) आणि फिटबीट प्रीमियम (Fitbit Premium)चा मोफत आनंद घेऊ शकतात.
गूगल पिक्सेल ९ एसह ग्राहकांना काय मोफत मिळेल?
गूगल पिक्सेल ९ ए (Google Pixel 9a) १९ मार्च २०२५ रोजी लाँच होण्याची अपेक्षा आहे. पण, अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. पण, समोर आलेल्या माहितीनुसार जर १९ मार्चला मोबाईल लाँच होणार असेल, तर गूगल पिक्सेल ९ एसह खरेदीदारांना अनेक गोष्टी मोफत मिळणार आहेत. त्यामध्ये ग्राहकांना सहा महिने मोफत यूट्यूब आणि फिटबीट प्रीमियम व तीन महिन्यांचे Google One सब्स्क्रिप्शन दिले जाईल, ज्यामुळे खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होईल.
Pixel 9a हे बजेट फ्रेंडली मॉडेल असल्याने, गूगल कदाचित 2TB Google One स्टोरेज देणार नाही आणि १०० जीबीपर्यंत मर्यादित करू शकत नाही. याव्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये काही अपडेटेड फीचर्स असू शकतात, ज्यामुळे खरेदीदारांना प्रीमियम, सब्स्क्रिप्शन या योजनांची निवड करावी लागेल.
Google Pixel Pa 2700nits पर्यंत पीक ब्राइटनेससह ६.३ इंच ॲक्टुआ डिस्प्लेसह येईल. स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी अंतर्गत स्टोरेजसह पेअर केलेल्या Tensor G4 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. Pixel 9a ड्युअल कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो, ज्यामध्ये ४८ एमपी मुख्य कॅमेरा आणि १३ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा असू शकतो. तसेच 5100mAh बॅटरी स्मार्टफोनमध्ये असू शकते.