Google हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण ती गुगलवर शोधात असतो. तसेच गेम, फिटनेस किंवा अन्य संबंधित App डाउनलोड करतो ते गुगल Play store वरून करतो. अँड्रॉइड फोनमध्ये आढळणारे App स्टोअर म्हणजेच Google Play Store चा सर्व्हर डाउन झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही समस्या जगभरातील वेब आणि मोबाईल वापरकर्त्यांना येत आहे. वेबसाइट किंवा App आउटेज आणि डाऊन्सवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, २५०० पेक्षा अधिक लोकांनी प्ले स्टोअर डाउन असल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

हेही वाचा : Reliance Jio: आता 5G नेटवर्क अजून फास्ट होणार, कारण Jio लवकरच लॉन्च करणार ‘हे’ जबरदस्त प्रॉडक्ट

अनेकांना अजूनही प्ले स्टोअर उघडण्यात अडचण येत आहे. तसेच Apps डाउनलोड करण्यात देखील अडचणी येत आहेत. मात्र सध्या कंपनीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google play store server down users can not downlaod and update apps tmb 01
Show comments