गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून १६ अ‍ॅप काढून टाकले आहेत. हे अ‍ॅप्स लवकर बॅटरी संपवतात, तसेच सामान्यपेक्षा अधिक डेटा खात असल्याचे गुगलला एका अहवालातून समजले होते. त्यानंतर गुगलने ही कारवाई केली. एआरएस टेक्निकाच्या अहवालानुसार, हे १६ अ‍ॅप्स मॅकएफीला आढळले होते. गुगल प्ले स्टोअरवर युटिलिटी अ‍ॅप म्हणून ते उपलब्ध होते. फ्लॅशलाइट, कॅमेरा, क्युआर रिडिंग आणि मेझरमेंटची सेवा ते देत होते.

हे आहेत ते अ‍ॅप

thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Emotional video Due to high rates of ambulance father took son from his bike viral video
कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये! पैसे नव्हते म्हणून मुलाला स्ट्रेचरवरून उचललं अन्…, पाहा काळजाला भिडणारा VIDEO
Viral Video Shows Students Dance On Fevicoal Se Song
हे दिवस पुन्हा येणे नाही…! ‘फेव्हिकॉल से’ गाण्यावर विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून जुन्या आठवणीत जाल रमून
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
now buy laptops monitors and printers on Blinkit
दुकानात जाण्याचे टेन्शन दूर! फक्त १० मिनिटांत डिलिव्हर होणार लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर; ‘Blinkit’ची नवीन सेवा सुरू!
  • BusanBus
  • Joycode
  • Currency Converter
  • High-Speed Camera
  • Smart Task Manager
  • Flashlight+
  • K-Dictionary
  • Quick Note
  • EzDica
  • Instagram Profile Downloader
  • Ez Notes

ओपन केल्यावर हे अ‍ॅप्स युजरच्या मोबाइलमध्ये अतिरिक्त कोड डाऊनलोड करत होते, ज्यामुळे त्यांना अ‍ॅड फ्रॉड करता येत होते. संक्रमित झालेल्या फोनला नंतर बॅकग्राउंडमध्ये युजरला सावध न करता वेब पेजेस उघडण्याचे नोटिफिकेशन्स, क्लिकिंग लिंक्स आणि अ‍ॅड्स यायचे.

(अबब.. २४ तासांत अ‍ॅपलचे ५० टक्के कर्मचारी घटले? अशी झाली कारवाई)

सुरक्षा फर्मनुसार, यातीला काही अ‍ॅप्स com.liveposting या नावाच्या अ‍ॅडवेअर कोडसह यायचे. हे कोड एजेंट म्हणून काम करतात आणि छुप्या अ‍ॅडवेअर सेवा चालवतात. तर इतर अ‍ॅप्सकडे com.click.cas नावाची अतिरिक्त लायब्ररी होती जी स्वयंचलित क्लिकिंग फंक्शनालिटीवर लक्ष केंद्रित करते. फसवे वर्तन लपवण्यासाठी हे अ‍ॅप लायब्ररी चालवण्यापूर्वी इन्स्टॉलेशन नंतर तब्बल एक तास प्रतीक्षा करायचे.

हे अ‍ॅप एफसीएमद्वारे वितरीत करण्यात आलेल्या संकेतस्थळांना भेट द्यायचे आणि युजरच्या वर्तनुकीची नक्कल करत बॅकग्राउंडमध्ये त्यांना ब्राउज करायचे. यामुळे नेटवर्क ट्राफिक मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि युजरला माहिती न होता उपकरणाची उर्जा कमी होते. यादरम्यान मालवेअर मागील व्यक्तीला लाभ मिळवून दिले जाते, असे मॅकएफीचे सांगरार्योल र्यू म्हणतात.

(सॅमसंगचा ‘हा’ महागडा 5G फोन मिळेल केवळ ३१ हजारात, जाणून घ्या दिवाळी ऑफर)

गुगलने हे अ‍ॅप्स प्लेस्टोअरवरून काढून टाकले आहेत. एआरएस टेक्निकाला दिलेल्या एका निवेदनात मॅकएफीद्वारे निदर्शनास आणून दिलेले सर्व अ‍ॅप्स काढून टाकल्याची पुष्टी गुगलच्या प्रवक्त्याने केली आहे. युजरला अशा अ‍ॅप्सना ब्लॉक करणाऱ्या गुगल प्ले प्रोटेक्टचे संरक्षण असल्याचेही प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

Story img Loader