Google Maps च्या मदतीने आज आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकतो. Google maps मुळे प्रवास अगदी सोपा झाला आहे. आता Google Mapsनी आणखी तीन नवे फीचर्स आणले आहेत. या फीचर्समुळे प्रवास आणखी सोपा होणार आहे. ते तीन फीचर्स कोणते? आणि आपल्यासाठी हे फीचर्स कसे फायद्याचे ठरणार? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
१. Glanceable directions
Google maps च्या या फीचरच्या मदतीने तुम्ही फोनची स्क्रीन लॉक असतानाही लोकेशनवर जाणारा रस्ता किंवा रूट पाहू शकणार. युजर्सला रस्त्यात येणाऱ्या वळणांविषयी वेळोवेळी सांगितले जाणार. यापूर्वी ही माहिती केवळ नेव्हिगेशन मोड (navigation mode)द्वारे दिसायची. जर युजर्स दुसरा रस्ता निवडत असेल तर गुगल तुमची ट्रिप अपडेट करणार.
Glanceable directions हे फीचर या महिन्यात जागतिक पातळीवर सुरू केले जाणार. पायी चालणारे, सायकल चालवणारे किंवा वाहन चालवणाऱ्यांना हे फीचर Android आणि iOS या दोन्ही डिव्हाइसवर दिसणार.
हेही वाचा : WhatsApp लवकरच आणणार ‘हे’ भन्नाट फिचर; आता व्हॉइस मेसेजप्रमाणेच पाठवता येणार…
२. New updates to Recents
Google नी Google Maps वर आणखी एक फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स Google Maps चा विंडो बंद केल्यानंतरही शेवटचे ठिकाण सेव्ह करू शकणार आहेत. या फीचर्समुळे जर तुम्ही ब्रेक घेतला तरीसुद्धा ट्रिप पुन्हा प्लॅन करण्याची गरज भासणार नाही; कारण ही ट्रिप गुगल सेव्ह करणार आहे. एवढंच काय तर युजर्स एकाच वेळी अनेक ट्रिप प्लॅन करू शकतात.
३. Immersive View
Google नी चार शहरांमध्ये Immersive View फीचर आणले आहे. या चार शहरांचे नाव Amsterdam, Dublin, Florence आणि Venice आहे. एवढंच काय तर कंपनी या फीचरमध्ये ५०० लॅण्डमार्क्सचा समावेश करणार आहे. AI (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) टेक्नोलॉजीचा वापर करून Immersive View भरपूर फोटोज एकत्र आणू शकतो आणि अनेक ठिकाणांना एकत्र करून एक मल्टिडायमेन्शनल दृष्टिकोन तयार करू शकतो.