Google हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. गुगलची भारत ही मोठी बाजारपेठ आहे. हजारो वापरकर्ते याचा वापर करतात. तसेच गुगलसुद्धा आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन अपडेट्स किंवा फीचर्स आणत असते. गेल्या वर्षी गुगलने मोबाईलवर सर्च रिझल्ट सुधारण्यासाठी Topic Filters नावाचे फिचर लॉन्च केले होते.

कंपनीने हेच फीचर आता गुगलच्या सर्च डेस्कटॉप व्हर्जनसाठी देखील लॉन्च केले आहे. हे फिचर तुम्ही सर्च केलेल्या शब्दावर आधारित असे इतर विषय सुचविण्याचे काम करते. उदाहरणार्थ , जर का तुम्ही गुगलवरती Pixel ७ असे सर्च केले तर तुम्हाला त्यामध्ये त्यासंबंधी बातम्या , त्याची किंमत , त्याचे फोटोज आणि उजव्या बाजूला त्याचे डिटेल्स आणि रिव्ह्यू अशी सगळी माहिती तुम्हाला दिसते. त्या फोनची माहिती वरील विषयांमध्ये वर्ग करून तुम्हाला गुगलवर या फीचरच्या माध्यमातून दिसणार आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात

हेही वाचा : Video: Google ला मोठा झटका; नवीन एआय ‘Bard’ने केलेल्या ‘या’ चुकीमुळे गमावले १०० अब्ज डॉलर्स

Google ने लॉन्च केला ड्रॉप-डाउन मेनू

google ने सर्च करण्यासाठी नवीन ड्रॉप डाऊन मेनू लॉन्च केला आहे. ज्याला ऑल फिल्टर्स असे नाव देण्यात आले आहे. याच्या मदतीने वापरकर्त्यांना फिल्टर सेट करता येतो. या फीचरच्या मदतीने ब्राउझिंग करताना त्यांचे आवडते टॅब सहजपणे सिलेक्ट करू शकतात. व त्यातून चांगले रिझल्ट मिळवू शकतात. सध्या हे फिचर अमेरिकेतील इंग्रजी वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. लवकरच हे इतर भाषा आणि अन्य प्रदेशांमध्ये विस्तारित होण्याची शक्यता आहे.