पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यावेळी सर्वात मोठे सर्च इंजिन असणाऱ्या गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी कंपनी गुजरात राज्यामध्ये त्यांचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडणार असल्याची घोषणा केली. तसेच भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये तब्बल १० अब्ज डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूक देखील करणार आहे.

”अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे ही सन्मानाची गोष्ट होती. Google भारताच्या डिजिटायझेशन फंडामध्ये १० अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक करणार आहे ही पंतप्रधानांसह सामायिक केली. ANI या वृत्तसंस्थेने सुंदर पिचाई यांच्या हवाल्याने सांगितले, आम्ही गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये आमचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उघडण्याची घोषणा करत आहोत. ”

हेही वाचा : Intel इंडियाच्या प्रमुख निवृत्ती राय यांचा २९ वर्षांनी राजीनामा, कसा राहिला कंपनीमधला प्रवास?

तसेच ते पुढे म्हणाले, ” आम्ही AI वर काम करणाऱ्या कंपन्यांसह गुंतवणूक करणे सुरू ठेवत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आमच्याकडे १०० भाषांचा उपक्रम आहे. आम्ही लवकरच आणि अधिक भारतीय भाषांमध्ये बॉट आणणार आहोत.” यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की गुजरात आंतरराष्ट्रीय फायनान्स टेक सिटी म्हणजेच जिला गिफ्ट सिटी म्हणून ओळखले जाते. ती गिफ्ट सिटी गांधीनगरमध्ये स्थित आहे.

तसेच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख अभियान डिजिटल इंडियासाठी असलेल्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचेही कौतुक केले. ते म्हणाले डिजिटल इंडिया अभियान एक ब्लू प्रिंट आहे जिला अन्य देश स्वीकारू पाहत आहेत. ते म्हणाले, ” डिजिटल इंडियासाठी पंतप्रधानांचे व्हिजन हे त्यांच्या काळाच्या खूप पुढचे होते आणि मी आता ते एक ब्लू प्रिंट म्हणून पाहतो जे इतर देश करू पाहत आहेत. ”

हेही वाचा : Mobile Recharge Plans: Vodafone-Idea च्या ‘या’ व्हाउचर प्लॅनमध्ये मिळतात ओटीटीचे फायदे, जाणून घ्या

जुलै २०२० मध्ये गुगलने पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतात १० अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली. कारण सर्च जायंट प्रमुख प्रदेश बाजारपेठेत डिजिटल सेवांच्या वापरामध्ये वेग वाढावा यासाठी मदत करू इच्छित आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुंदर पिचाई यांनी घोषणा केली होती की, डिया डिजिटायझेशन फंड (IDF) चा एक भाग भारतीय स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करेल आणि या फंडातून $३००दशलक्षची एक चतुर्थांश रक्कम महिलांच्या नेतृत्वाखालील संस्थांमध्ये गुंतवली जाईल.

Story img Loader