दिवाळी, भाऊबीजच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची खरेदी केली जाते आहे. स्मार्टफोन खरेदीचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. साहजिकच कुठलेही फोन घेण्यापूर्वी आपण त्याची तुलना इतर फोनशी करतो, त्यांची वैशिष्ट्ये, किंमत सर्व तपासून जो चांगला आहे, तो निवडतो. यासाठी आपण अनेक संकेतस्थळे बघतो. यासाठी अ‍ॅप्स देखील उपलब्ध आहेत. परंतु, एकापाठोपाठ एक अनेक संकेतस्थळे पाहणे वेळ खाऊ आहे. त्याऐवजी एका ठिकाणीच जर आपल्याला मोबाईल्सची तुलना आणि बेस्ट डिलबाबात माहिती मिळाली तर आपला भरपूर वेळ वाचू शकतो. असे एक संकेतस्थळ उपलब्ध आहे.

तुमची खरेदी सोपी करण्यासाठी गुगल शॉपिंग हा चांगला पर्याय आहे. गुगल शॉपिंग तुम्हाला इ कॉमर्स साइटवरील बेस्ट डिल शोधण्यात मदत करू शकते. तसेच ते तुम्हाला स्वस्तात चांगला फोन मिळण्यात मदत देखील करू शकते. गुगल शॉपिंग हे सर्चसाठी गुगल टेक्नॉलॉजीचा वापर करते. याद्वारे गुगल तुम्हाला पाहिजे ती वस्तू शोधते आणि तिची माहिती देते. त्याचबरोबर, सर्च केलेल्या वस्तूची किंमत, बेस्ट डिल आणि तुलनात्मक माहिती देखील देते. याने एकाच साईटवर तुम्हाला वस्तूविषयी विविध प्रकारची माहिती मिळते. याने वस्तू घ्यावी की नाही हे ठरवणे सोपे जाते.

(नेटफ्लिक्सकडून युजर्सना मोठा धक्का! आता पासवर्ड शेअरींगसाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे)

गुगल शॉपिंगमध्ये प्राइज ट्रॅकर देखील देण्यात आला आहे. हे ट्रॅकर निवडलेल्या वस्तूच्या किंमतीचा ग्राफ दाखवतो. जर तुम्ही आयफोन १४ किंवा आयफोन १३ बचतीसह घेण्याचा विचार करत असाल तर हे संकेतस्थळ तुमच्या कामी येऊ शकते. गुगल शॉपिंगवर बेस्ट डिल शोधण्यासाठी पुढील स्टेप्स करा.

  • shopping.google.com या संकेतस्थळावर जा.
  • तुम्हाला जो स्मार्टफोन खरदी करायचा आहे तो सर्चबारमध्ये शोधा.
  • तुम्ही आपले सर्च फिल्टर देखील करू शकता. प्राइज रेंज, फोनचे रंग, स्टोअरेज पर्याय आणि ४जी किंवा ५जी यापैकी कुठला फोन हवा हे सिलेक्ट करून तुम्ही माहिती फिल्टर करू शकता. याने तुम्हाला नेमक्या त्याच फोनची माहिती मिळेल ज्यावर तुम्हाला बेस्ट डिल हवी आहे.
  • नंतर गुगल अ‍ॅडसह तुमच्या फोनसंबंधी सर्व पर्याय देईल. येथे ‘बेस्ट मॅच टॅब’ खालील ‘व्ह्यू प्रोडक्ट डिटेलवर’ क्लिक करा.
  • येथे तुम्ही दोन फोन्सची तुलना करू शकता. त्यातून चांगला फोन निवडण्यात तुम्हाला मदत होईल. त्याचबरोबर तुम्ही फोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊ शकता आणि बेस्ट डिल्स देखील शोधू शकता.