गुगलमुळे अनेक सुविधा सुखकर झाल्या आहेत. या कंपनीचे अनेक अ‍ॅप्स आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून रस्ता शोधणं सोपं होतं. सध्या प्रवासात रस्ते शोधण्यासाठी गुगल मॅपसह इतरही काही अॅप्सचा वापर करण्यात येतो. यामध्ये चांगल्या व्ह्यूसाठी गुगलने ‘गुगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅप’ युजर्ससाठी आणले होते. पण आता हेच अॅप बंद करण्याची घोषणा गुगलच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात या अ‍ॅपचा वापर करता येणार नाही.

गुगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅप हे येत्या २१ मार्च २०२३ पर्यंतच सुरू राहणार आहे. त्यानंतर हे अॅप बंद करण्यात येईल, अशी घोषणा गुगलकडून करण्यात आली आहे. 9To5Google नुसार गुगलने या अॅपचे अनेक शटडाऊन मेसेज तयार केले आहेत. या मेसेजच्या माध्यमातून स्ट्रीट व्ह्यू अॅप वापरणाऱ्या युजर्सना अॅप बंद होण्यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. अँन्ड्रॉईड आणि iOS वर सध्या हे अॅप उपलब्ध आहे. स्ट्रीट व्ह्यू सोबतच या अॅपच्या माध्यमातून गुगल मॅपवर ठिकाणे सर्च करण्याची परवानगीही देण्यात येते.

गुगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅप काय आहे?
गुगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅप हे एक असे तंत्रज्ञान आहे जे गुगल मॅप आणि गुगल अर्थच्या माध्यमातून रस्त्यांची आणि रस्त्यांवरील ठिकाणांची माहिती देते. हे तंत्रज्ञान सर्वप्रथम २००७ साली अमेरिकेच्या शहरांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर जगभरातील शहरे आणि ग्रामीण भागांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. गुगल मॅपमध्ये ज्या रस्त्यांचा फोटो उपलब्ध आहे त्या रस्त्यांना निळ्या रंगाच्या पट्टीने उठावदार करण्यात आले आहे. रस्त्यांव्यतिरिक्त संग्रहालये तसेच रेस्टॉरंट्सचा देखील यात सामावेश करण्यात आले आहे.

आणखी वाचा : आनंदाची बातमी! ‘या’ दिवसापासून भारतीय आयफोन वापरकर्त्यांना मिळणार 5G सेवा

गुगल का हटवतोय ‘हा’ अॅप ?
अद्याप गुगल स्ट्रीट व्यू ला एक वेगळे मोबाईल अॅप होते. परंतु, गुगलकडून यूजर्सला गुगल मॅप मध्ये स्ट्रीट व्ह्यू फीचर दिले जात होते. नुकतेच भारतात स्ट्रीट व्ह्यू फीचरला लाँच करण्यात आले होते. या फीचर मध्ये कोणताही रस्ता किंवा गल्लीला ३६० डिग्री व्ह्यू मिळत होता. सोबत फोटो आणि व्हिडीओ पाहून रस्त्यांना ओळखता येत होते. परंतु, आता यूजर्स गुगल मॅप मध्ये स्ट्रीट व्ह्यू फीचर दिल्यानंतर गुगल वेगळे पद्धतीने या फीचरचा सपोर्ट बंद करणार आहे. गुगल मॅप मध्ये स्ट्रीट व्ह्यू मध्ये जास्तीत जास्त लोकेशन जोडले जात आहे.

Story img Loader