जगभरातील कॉर्पोरेट क्षेत्रात ‘गुगल वर्कस्पेस’चा (Google Workspace) सर्वाधिक वापर होत आहे. यात गुगल डॉक्स (Google Docs), शीट्स (sheets) सारखे अॅप्लिकेशन्स अधिक वापरले जातात. यामुळे गुगल वर्कस्पेसमधील अॅप्समध्ये सतत नवे बदल करत वापरकर्त्यांना अनेक नव्या सुविधा देण्याचा प्रयत्न करते. आता गुगल वर्कस्पेसमधील गुगल डॉक्समध्ये मोठे अपडेट पाहायला मिळणार आहे. यासोबत गुगल ड्राईव्ह, गुगल शीट्समध्ये अनेक नवे फीचर्स समाविष्ट होणार आहेत.
एका अहवालानुसार, गुगल वर्कस्पेस आपल्या अॅप्लिकेशन्समध्ये नवीन बदल करत आहे. यात गुगल ड्राईव्ह, गुगल डॉक्स, गुगल शीट्स आणि गुगल स्लाइड्स लवकरच गुगलच्या मटेरियल डिझाइन 3 सह एकत्रित दिसणार आहेत. गुगल वर्कस्पेसचा नवा लूक अलीकडेच अपडेट झालेल्या जीमेलशी मिळता जुळता असेल. तर लेआउटचा रंग सफेद आणि टूलबार आणि कमेंट्स सेशन गडद रंगाचा असेल. नवीन अपडेटमध्ये शेअर बटणाला गोलाकार कडा दिली असेल.
भारतातील रस्त्यांवर धावणार आता हायड्रोजन बसेस, धुराऐवजी सोडणार पाणी
गुगलने वापरकर्त्यांना त्यांची कामं सहजतेने पूर्ण करण्यासाठी ड्राईव्हची संख्या वाढवली आहे. आता वापरकर्त्यांना गुगल ड्राईव्हमधील एखाद्या फाईलवर काम करताना एकाचवेळी अनेक फाईल्स शेअर, डाऊनलोड आणि डिलीट करता येणार आहेत. गुगल वर्कस्पेसच्या नव्या इंटफेसमध्ये वापरकर्त्यांना सर्च चीप्सचा पर्याय देखील दिला आहे. यातून वापरकर्त्यांला फाईल्सचा प्रकार, त्याचा क्रिएटर, आणि ती फाइस शेवटची केव्हा अपडेट झाली हे पाहता येणार आहे. तसेच संबंधित फाईलमध्ये लगेच इंटर करता येणार आहे.
याशिवाय गुगलने आपल्या स्मार्ट कॅनव्हासमध्ये आणखी काही फिचर्सची घोषणा केली आहे. टेक जायंटने वापरकर्त्यांना डेटासंदर्भात मदत करण्यासाठी स्मार्ट चिप्सशी संबंधित आणखी काही फिचर्स समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. शीट्स सेटिंगबाबत मदत करण्यासाठी स्मार्ट चीप्सचा वापर होतो. यामुळे गुगल आता विविध प्रकारच्या माहिती आणि डेटाचे प्रकार वाढत आहे. यातून एकाचवेळी वर्कस्पेसवरील तर अॅप अॅक्सेस करता येतील.
गुगलने त्याच्या इंटरफेसवर कस्टम बिल्डिंग, कॅलेंडर इनवाइट टेम्पलेट, व्हेरिएबल्स, इमोजी व्होटिंग चिप्स आणि थर्ड-पार्टी स्मार्ट चीप्स सारखे फिचर्स देखील लाँच केले आहेत. हे सर्व अपडेट्स येत्या आठवड्यात समोर येतील.