Online Shopping Platform: सध्या सणांचा हंगाम सुरु झाला आहे. या सणांच्या काळात लोकं मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असणाऱ्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टनेही आपल्या मोठा सेल सरु केलाय. अमेझॉनचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ आणि फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज’ हे दोन्ही सेल देशात सुरु झाले आहेत. विशेषता अनेक लोकं या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन मोठ्या प्रमाणात आॅनलाइन शाॅपिंग करतात. या प्लॅटफॉर्मवर परवडणाऱ्या किमतीत वस्तू मिळत असल्याने लोकांचा कल या प्लॅटफॉर्मकडे वाढला आहे. पण यातच आता एका सरकारी वेबसाईटने सर्वात स्वस्त सामान विकून अमेझॉन आणि फ्लिपकार्टलाही आता जोरदार टक्कर दिली आहे.
खरंतर देशातील स्वस्त सामान विकणारी एक सरकारी वेबसाइट आहे ज्यावर एक सर्वेक्षण देखील केले गेले आहे आणि त्यावरील उत्पादनांची किंमत ऑनलाइन शॉपिंग साइट्सपेक्षा खूपच कमी असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण ही कोणती सरकारी वेबसाइट आहे, ज्यातून तुम्हाला स्वस्त सामान खरेदी करता येईल त्याविषयी जाणून घेणार आहोत.
(हे ही वाचा : एक्स वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! एलॉन मस्क लवकरच लॉन्च करणार ‘हे’ दोन नवीन प्लॅन्स, जाणून घ्या )
‘या’ सरकारी वेबसाइटवर सर्वात स्वस्त मिळतायत वस्तू
वास्तविक, Gem नावाचे एक सरकारी ऑनलाइन मार्केट प्लेस आहे जे अतिशय वाजवी दरात उत्पादने विकण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. या प्लॅटफॉर्मवर ग्राहक चांगल्या दर्जाची उत्पादने खरेदी करू शकतात. या सरकारी वेबसाइटवर तुम्हाला उत्पादनांची दीर्घ श्रेणी मिळते. वेबसाइटवर ऑफर केलेल्या सर्व उत्पादनांची गुणवत्ता जबरदस्त आहे, कारण या वेबसाइटवर उत्पादनाच्या गुणवत्तेवर खूप भर दिला जातो, असे अनेक मिडिया रिपोर्टसमधून दावा करण्यात आलाय.
Gem सरकारी वेबसाइटवर उत्पादनांच्या किमती किती कमी आहेत?
२०२१-२२ मध्ये झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, इतर ई-कॉमर्स वेबसाइटच्या तुलनेत सरकारी Gem पोर्टलवर स्वस्त दरात १० उत्पादने उपलब्ध करून दिली जात आहेत. या उत्पादनांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. ज्या उत्पादनांची किंमत कमी आहे, त्यांची गुणवत्ताही मजबूत राहते. सर्वेक्षणात उघड झालेल्या १० उत्पादनांच्या किमती इतर वेबसाइटवर ९.५ टक्क्यांनी जास्त आहेत. अशा स्थितीत जर ग्राहकांनी Gem या सरकारी वेबसाइटवरुन वस्तूंची खरेदी केली तर त्यांची पैशांची मोठी बचतही होऊ शकते.