गेल्या काही वर्षांमध्ये गूगलने आपल्या पिक्सेल ६a, पिक्सेल ७ व पिक्सेल ८ यांसारख्या सीरिज आणून स्मार्टफोन व्यवसायात आपले एक स्थान निर्माण केले आहे. मागील वर्षात म्हणजे २०२३ मध्ये गूगलने आपला पिक्सेल ८ हा फोन ग्राहकांसाठी आणला असून, पिक्सेल ७ प्रो या स्मार्टफोनचे २०२२ या वर्षात अनावरण केले होते. हे फोन येऊन जरी एक-दोन वर्षे झाली; परंतु त्यांच्या किंमत आणि कॅमेऱ्याच्या उत्तम दर्जामुळे ग्राहकांमध्ये अजूनही त्या फोनबाबत चांगलीच चर्चा आणि पसंती मिळत असल्याचे दिसते.
त्यामुळे तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करीत असाल, तर सध्या फ्लिपकार्टवर गूगल पिक्सेल ७ प्रो या स्मार्टफोनसाठी चांगलीच म्हणजे जवळपास २६ हजार रुपयांची सूट मिळणार आहे, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळाली आहे.
हेही वाचा : Itel A70, भारतात लॉन्च होणाऱ्या २५६ जीबी स्मार्टफोनची किंमत पाहून व्हाल थक्क!! फोन विकत घेण्यासाठी लावाल भलीमोठी रांग, पाहा
गूगल पिक्सेल ७ प्रो स्मार्टफोनवर किती रुपयांची सूट?
गूगलचा पिक्सेल ७ प्रो या फोनची मूळ किंमत ८४,९९९ रुपये इतकी आहे; परंतु फ्लिपकार्टवर मात्र तुम्ही हा फोन चक्क ५८,९९९ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. म्हणजेच फ्लिपकार्ट या फोनवर ३१ टक्के एवढी भलीमोठी सूट देत आहे. या फोनवर ग्राहक २६ हजार रुपयांची बचत करू शकतील. इतकेच नव्हे, तर तुम्ही बँक आणि इतर ऑफर्सचा वापर करून अजून फायदा करून घेऊ शकता.
परंतु, ही ऑफर गूगल पिक्सेल ७ सोबत आलेल्या १२ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या या सिंग्युलर मॉडेलवर उपलब्ध असणार आहे.
गूगल पिक्सेल ७ प्रो स्मार्टफोनची खासियत
गूगलचा या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच LTPO OLED डिस्प्ले आणि १२०Hz रिफ्रेश रेट मिळणार आहे. पिक्सेल ७ प्रो अॅण्ड्रॉइड १३ या सिस्टीमवर काम करीत असून, हा फोन वापरताना तो अप टू डेट असल्याचा आणि उत्तम काम करीत असल्याचा अनुभव वापरकर्त्यांना देतो. या फोनमध्ये रोबस्ट४९२६mAh [robust 4926mAh] बॅटरी असून, ३०w वायर चार्जिंगला सपोर्ट करते.
गूगल पिक्सेल ७ प्रो स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर टेन्सर जी-२ प्रोसेसर बसवण्यात आला आहे; जो कोणत्याही अॅप्स किंवा सुरळीतपणे काम करण्यासाठी हा फोन मदत करतो. या फोनच्या कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचे झाले, तर पिक्सेल ७ प्रोमध्ये 5G आणि 4G उपलब्ध असून, वायफाय ६ E, ब्ल्यूटूथ ५.२, जीपीएस, एनएफसी, आणि सी टाईप यूएसबी पोर्ट देण्यात आलेला आहे.
हेही वाचा : विवो X100 स्मार्टफोन सीरिज ‘या’ तारखेला होणार भारतात लॉन्च; काय आहेत याचे फिचर्स आणि किंमत जाणून घ्या…
तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनच्या समोरील भागात १००MP कॅमेरा बसवण्यात आला आहे. तसेच, ट्रिपल कॅमेरा सेटअप असेलेला ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. ४८ मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे; ज्यामुळे तुम्ही अतिशय सुंदर असे फोटो काढू शकता.