आजच्या काळात आपली सगळी कामं कुठल्यातरी अॅपच्या मदतीने पूर्ण होतात, मग ती खरेदी असो, बँकिंग असो, काही खाण्यासाठी हवं असो किंवा इतर काही असो. असेच एक उपयुक्त आणि नेहमीचं वापरलं जाणार अॅप म्हणजे गुगल मॅप्स (Google Maps ), ज्याच्या मदतीने तुम्ही जगातील कोणत्याही ठिकाणी जाण्याचा मार्ग शोधू शकता. पण गुगल मॅप वापरण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे हे तुम्ही जाणून असालं. पण, तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही इंटरनेटशिवायही गुगल मॅप वापरू शकता? कसं ते जाणून घ्या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंटरनेटशिवाय वापरा गुगल मॅप

जर तुम्ही विचार करत असाल की तुम्ही इंटरनेटशिवाय गुगल मॅपचा वापर करू शकता असा कोणता मार्ग आहे, तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे फीचर नवीन नाही. गुगल मॅप ऑफलाइन मॅप प्रदान करते. हे करण्यासाठी, तुम्हाला मॅप अगोदर सेव्ह करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही इंटरनेटशिवायही या अॅपवर तुमच्या गंतव्यस्थानाचा मार्ग शोधू शकता. या फीचरचे अनुसरण करण्याच्या स्टेप्स काय आहे ते जाणून घ्या.

(हे ही वाचा: Jio Recharge Plan: ‘हा’ प्लॅन झाला १०० रुपयांनी स्वस्त! सोबत मिळणार अनेक फायदे)

‘असं’ वापरा हे फिचर

हे फीचर वापरायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर गुगल मॅप उघडावे लागेल. अॅपच्या होम स्क्रीनवर, वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तुमच्या प्रोफाइलच्या आयकॉनवर क्लिक करा आणि येथे तुम्हाला ‘ऑफलाइन मॅप’ पर्याय दिसेल. हा पर्याय निवडताच, तुम्हाला स्क्रीनवर दोन्ही ठिकाणांची माहिती द्यावी लागेल जशी की तुम्हाला कुठून कुठे जायचे आहे. त्यानंतर ‘डाउनलोड’ वर टॅप करा आणि मॅप डाउनलोड करा.

(हे ही वाचा: Airtel चा ‘हा’ आहे सर्वात स्वस्त वार्षिक रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या फायदे)

लक्षात घ्या गुगल मॅपवर मॅप थोड्या काळासाठी डाउनलोड केले जाऊ शकतात, म्हणजेच ते काही दिवसांनी एक्स्पाइर होतात, त्यामुळे ते अपडेट करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great feature of google maps the way can show even without internet find out how ttg