अफगाणिस्तानात तालिबानने डोकं वर काढताच पाकिस्तानी हॅकर्संनी अफगाण युजर्संच्या ईमेल आणि सोशल मीडिया खात्यांवर हल्लाबोल केला होता. फेसबुक, ट्विटर, अल्फाबेट, गुगल, मायक्रोसॉफ्ट, लिंक्डइन या कंपन्यांनी संभाव्य धोका लक्षात घेत खाती तात्काळ लॉक केली होती. पाकिस्तानी हॅकर्सनी अफगाण यूजर्सना टार्गेट करण्यासाठी सर्वाधिक फेसबुकचा वापर केल्याचं समोर आलं आहे, तसेच हॅकर्सनी तत्कालीन अफगाण सरकार, सैन्य, सुरक्षा एजन्सीशी संबंधित लोकांची खाती हॅक करण्याचा प्रयत्न केला होता.

फेसबुकने सायबर सुरक्षा उद्योगातील साइडकॉपी म्हणून ओळखला जाणारा ग्रुप ऑगस्टमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला होता. हा ग्रुप वेबसाइट्सच्या लिंक्स पाठवून मालवेअर पाठवायचा आणि याद्वारे खाते हॅक केली जात होती, असा खुलासा करण्यात आला आहे. साईड कॉपी ग्रुप काल्पनिक तरुणींच्या नावाने प्रलोभन द्यायचे आणि प्रणयाचे आमिष दाखवून गोपनीय माहिती उघड करायचे. त्याचप्रमाणे चुकीचे चॅटिंग अॅपही डाऊनलोड करून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवले जाते. हॅकर्सचा नेमका हेतू काय होता हे कळणे कठीण आहे. हॅकर्स अडकलेल्या लोकांचे काय करतात?, याबाबत फेसबुकलाही माहिती नाही.

नोकियाची सॉफ्टवेअर सर्व्हिस मार्केटमध्ये एन्ट्री; टेलिकॉम कंपन्यांना देणार सुविधा

फेसबुकने गेल्या महिन्यात दोन हॅकिंग गटांची खाती निष्क्रिय केली आहेत. ही खाती सीरियन हवाई दलाच्या गुप्तचर संस्थांशी संबंधित होती. एक गट, सीरियन इलेक्ट्रॉनिक आर्मी म्हणून ओळखला जातो. यात मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि सत्ताधारी राजवटीचा विरोध करणारे होते. तर इतर हॅकर्सनी फ्री सीरियन आर्मीशी संबंधित लोकांना आणि विरोधी सैन्यात सामील झालेल्या माजी लष्करी कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले होते.

Story img Loader