जगभरात हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. डेटा चोरी करून पैसे बळकवण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून केला जातो. यापासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. विशेषत: आता क्रेडिट कार्डची माहिती देताना अधिक सतर्क राहिले पाहिजे, कारण हॅकर्सची नजर आता तुमच्या क्रेडिट कार्डवर आहे. क्रेडिट कार्डचा डेटा चोरी करण्यासाठी त्यांनी मोठी तयारी केली आहे. एका हॅकर न्युज डॉटकॉमच्या अहवालानुसार, हॅकर्सनी क्रेडिट कार्डचा डेटा चोरण्यासाठी पीओएस मालव्हेअरचा वापर करायला सुरुवात केली आहे. या मालव्हेअरने आधीच विविध पेमेंट प्लाटफॉर्म्सवरून १ लाख ६७ हजार क्रेडिट कार्डबाबत माहिती चोरली आहे.

चोरलेल्या डेटाद्वारे हॅकर्सना ३.३४ दशलक्ष डॉलर्सचा नफा मिळू शकतो, अशी माहिती सिंगापूर येथील सायबर सिक्युरिटी कंपनी ग्रुप आयबीने दिली आहे. मालव्हेअर पेमेंट डेटा गोळ्या करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मालव्हेअर जावा स्क्रिप्ट स्निफरच्या भरवशावर ई कॉमर्स संकेतस्थळांवरून टेक्स्ट डेटा जसे, बँक कार्ड क्रमांक, क्रेडिट कार्डची मुदत संपण्याची तारीख, कार्ड वापरकर्त्याचे नाव, पत्ता आणि सीव्हीव्ही मिळवतो.

(एलॉन मस्क यांची अनोखी एन्ट्री, ट्विटर मुख्यालयात चक्क नेले सिंक; बायोडेटाही केला अपडेट)

मागील महिन्यात कॅस्परस्कीने फसवणूक करून पैसे कमवणारा एक ब्राझिलियन व्यक्ती प्रिलिक्स याने वापरलेल्या नव्या युक्तीबाबत माहिती दिली होती. या माहितीनुसार, जवळपास सर्व मालव्हेअर स्ट्रेन्समध्ये कार्डमधून माहिती काढण्याची क्षमता होती. मात्र डेटा एक्सफिल्ट्रेशन आणि प्रक्रियेची पद्धत वेगळी होती. बहुतांश मालव्हेअर हल्ले हे अमेरिका, प्युर्टो रिको, पेरू, पनामा, युके, कनाडा, फ्रान्स, पोलांड, नॉर्वे आणि कोस्टा रिका येथील बँक्सकडून देण्यात आलेल्या कार्ड्सवर करण्यात आले होते.

ग्रुप आयबीनुसार, पॉइंट ऑफ सेल मालव्हेअर हे एक घातक सॉप्टवेअर असून ते कार्डमागील मॅग्नेटिक स्ट्रिपमध्ये साठवलेला पेमेंट डेटा चोरी करण्याच्या हेतूने पीओएस टर्मिनलवर हल्ला करतो. संकेतस्थळानुसार, आधुनिक क्रेडिट कार्डवरील सुरक्षा यंत्रणेमुळे पीओएस मालव्हेअर हे कमी लोकप्रिय आहे. मात्र ते अजूनही कार्यरत आहे आणि धोकादायक आहे. हा मालव्हेअर वर उल्लेख केलेल्या ठिकाणी वापरण्यात येणारे क्रेडिट कार्ड आणि पेमेंटसाठी मॅग्नेटिक स्ट्रिप असलेले कार्ड वापरत असलेल्यांसाठी धोकादायक आहे.

Story img Loader