Haier ही एक लोकप्रिय आहे. होम अप्लायन्सेस ब्रँड असणाऱ्या हायर कंपनीने भारतात आपली नवीन QLED TV सिरीज लॉन्च केली आहे. नवीन Haier QLED Smart TVला google Tv सह लॉन्च करण्यात आले आहे. तर या टीव्हीमध्ये कोणकोणते फीचर्स आहेत , स्पेसिफिकेशन्स काय आहेत आणि किंमत काय असणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Haier QLED TV S9QT चे फीचर्स
Haier QLED TV S9QT सिरीजमध्ये ५५ आणि ६५ इंचाचे दोन टीव्ही खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. या दोन्ही मॉडेलमध्ये 4K QLED पॅनल देण्यात आले आहे. याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या दोन्ही टीव्हींचा डिस्प्ले Dolby Vision IQ सर्टिफिकेनसह येतात. तसेच याला HDR चा सपोर्ट मिळतो. याशिवाय, डिस्प्ले हाय कॉन्ट्रास्ट रेशो, लोकल डिमिंग आणि MEMC 120 Hz ला सपोर्ट करतो.
QLED TV S9QT सिरीजमधील हे दोन्ही टीव्ही मेटॅलिक फ्रेम आणि स्लिम डिझाईनमध्ये येतात. टीव्हीमध्ये बेझल लेस डिझाईन देण्यात आले आहे. हायरचा नवीनतम QLED टीव्ही 30W फ्रंट-फायरिंग स्पीकर्ससह लॉन्च करण्यात आला आहे आणि तो डॉल्बी अॅटमॉस साउंड सपोर्टसह येतो. याच्या टेक्निकल फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या टीव्हीमध्ये TEE 1.3Ghz सह ARM CA73 Quad Core CPU देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये C52 MC1 @SSOMHz CPU, 3 GB RAM आणि ग्राफिक्ससाठी 32 GB इनबिल्ट स्टोरेज आहे.कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये वाय-फाय 5. क्रोमकास्ट, ब्लूटूथ 5.1, एचडीएमआय 2.1 आणि यूएसबी 2.0 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
काय असणार टीव्हीची किंमत ?
नवीन Haier QLED TV S9QT ची भारतात किंमत ६९,९९९ रुपयांपासून सुरु होते. ५५ इंचाचे मॉडेल हे ६९,९९९ रुपये तर , ६५ इंची स्मार्ट टीव्हीला ९१,१९० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. लेटेस्ट हायर टीव्हीला हायरच्या ई-कॉमर्स स्टोअर आणि रिटेल आऊटलेटमधून खरेदी करता येणार आहे. सध्या, कंपनीने नवीन स्मार्ट टीव्ही ऑनलाइन उपलब्ध करण्यासंबंधी कोणतीही माहिती दिलेली नाही.