How to download certificate of Har Ghar Tiranga 2024 : दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस मध्ये तिरंगा फडकवण्यात येतो. एकूणच सर्व भारतीय उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा करतात.तर केंद्र शासनाने २०२२ पासून ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) (Har Ghar Tiranga 2024) अभियान सुरू केले आहे. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे, तर भारतीय जनता पक्षाने ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा २०२४’ (Har Ghar Tiranga 2024) अभियानाची तिसरी आवृत्ती सुरू केली आहे. ’हर घर तिरंगा’ अभियानाचा महत्त्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे.

२८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी’मन की बात’ रेडिओ कार्यक्रमात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या (Har Ghar Tiranga 2024) ११२ व्या आवृत्तीत हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे; असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Indian Army Day 2025 Wishes in Marathi| Happy Indian Army Day 2025
Indian Army Day 2025 Wishes : लष्कर दिनाच्या द्या भारतीय जवानांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Municipal Corporation Election, Pimpri Chinchwad ,
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक

तर ११ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीत भाजपा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तिरंगा यात्रा काढणार आहे, १४ ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये मूक मोर्चा काढून स्मृती दिन साजरा केला जाणार आहे. तसेच १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी ‘तिरंगा’ (राष्ट्रीय ध्वज) सर्व घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर फडकवला जाईल आणि संपूर्ण देश भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या समुद्रात बदलेल.

हेही वाचा…Aadhaar Card : आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? चिंता सोडा! फक्त ‘या’ सहा स्टेप्स फॉलो करा

भाजपाचे अधिकारी, नेते आणि लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतील आणि तिरंगा देशभरातील प्रत्येक बूथपर्यंत पोहोचेल. २०२२ पासून भाजपा देशातील जनतेबरोबर ‘हर घर तिरंगा’ मोहीम मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. या मोहिमेत पुन्हा एकदा देशभरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येईल, अशी आशा वर्तवण्यात येत आहे. देशभरात भाजपाचे राज्य अधिकारी, मोर्चा संघ, जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संघांसोबत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. ’हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी जिल्हा आणि विभागीय समित्यांसह बैठकाही होत आहेत; असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी ‘या वर्षीचा स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येत आहे, तसं तसं मी माझे प्रोफाईल पिक्चर बदलत आहे आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तेच करून ‘हर घर तिरंगा’ साजरा करण्यात माझ्याबरोबर सामील व्हा आणि हो, तुमचे सेल्फी https://harghartiranga.com वर शेअर करा,” असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तर ‘हर घर तिरंगा’ प्रमाणपत्र (Har Ghar Tiranga 2024) कसे डाउनलोड करायचे, यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा…

१. सगळ्यात पहिल्यांदा harghartiranga.com वेबसाइटवर जा. तेथे होमपेजवर ‘click to participate’ टॅब असेल.

२. हा टॅब तुम्हाला तुमचे नाव, फोन नंबर, राज्य आणि देश लिहिण्यास सांगेल.

३. माहिती लिहिल्यानंतर प्रतिज्ञा काळजीपूर्वक वाचा – “मी शपथ घेतो की मी तिरंगा फडकावीन, आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि शूर पुत्रांच्या आत्म्याचा आदर करीन आणि भारताच्या विकासासाठी, प्रगतीसाठी स्वत:ला समर्पित करीन.”

४. एकदा तुम्ही हे पूर्ण केलं की, ‘take pledge’ वर क्लिक करा आणि तुम्हाला एका पेजवर रीडायरेक्ट केले जाईल, जिथे तुम्ही तुमचे सेल्फी तिरंग्यासह अपलोड करू शकता.

५. जेव्हा पोर्टल तुम्हाला साइटवर चित्र वापरण्याची परवानगी विचारेल तेव्हा सबमिट करा, क्लिक करा. एकदा असं केल्यावर तुम्ही जनरेट सर्टिफिकेटवर क्लिक करू शकता आणि ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत तुमचा सहभाग सिद्ध करू शकता.

Story img Loader