बीएसएनएलकडे त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतींचे प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध असतात. वास्तविक, बीएसएनएल खाजगी कंपन्या जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया सोबत स्पर्धा करण्यासाठी अनेक योजना ग्राहकांना ऑफर करते. ज्या कमी किमतीत जास्तीत जास्त फायदे देतात. जर तुम्ही देखील बीएसएनएलचे सदस्य असाल आणि मोठ्या वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशाच एका प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. हा प्लॅन कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लॅनपैकी एक आहे, जो 6 महिन्यांसाठी दररोज 3 जीबी डेटासह येतो. विशेष बाब म्हणजे इतर कंपन्या या किंमतीत निम्मी वैधता आणि डेटा देतात.
बीएसएनएलचा ९९७ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलने ९९७ रुपयांचा प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. या प्लॅनमध्ये इतर अनेक सेवा देखील बीएसएनएलने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत . ९९७ च्या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले सर्व फायदे त हे रिचार्ज कसे केले जाऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कसा कराल ‘हा’ प्लॅन रिचार्ज
बीएसएनएल वापरकर्ते ९९७ चे प्रीपेड रिचार्ज बीएसएनएल सेल्फ केयर ॲप आणि रिचार्ज पोर्टल द्वारे ऑनलाइन करू शकतात. त्याच वेळी, या रिचार्जबद्दल अधिक माहितीसाठी, कंपनीला १५०३ किंवा ९४१४०२४३६५ या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर कॉल करता येईल. आता या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
मिळेल ५४० जीबी डेटा
बीएसएनएलचा ९९७ रुपयांचा प्लान ६ महिन्यांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच, या रिचार्जमध्ये तुम्हाला १८० दिवसांसाठी डेटा आणि कॉलिंग पूर्णपणे मोफत मिळेल. वास्तविक, प्लॅनमध्ये १८० दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे, ग्राहक एकूण ५४० जीबी डेटा वापरू शकतात.
कॉलिंग आणि एसएमएस देखील फ्री
यासोबतच प्लॅनमधील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्याच वेळी, रिचार्जमध्ये दररोज १०० एसएमएसचा लाभ देखील उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन आणि लोकधुन कंटेंटचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.