HDFC Bank News: सध्या प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो , लॅपटॉप वापरतो. अनेक अशा गोष्टी आता टेक्नॉलॉजीमुळे सोप्या झाल्या आहेत. टेक्नॉलॉजीमुळे आपल्या आयुष्यात प्रगती झाली आहे. जीवन सोपे झाले आहे. मात्र या टेक्नॉलॉजीचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. यामध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 

ऑनलाईन किंवा एसएमएस तसेच फोन कॉलद्वारे लोकांची फसवणूक केली जाते. अलीकडेच काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, HDFC बँकेच्या लाखो ग्राहकांचा डेटा डार्कवेबवर लीक झाला आहे. प्रायव्हसी अफेअर्सनुसार हॅकर्सनी Cybercriminal तब्बल ६ लाख लोकांची वैयक्तिक माहिती पोस्ट केली होती.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक

हेही वाचा : Reliance Jio ने लॉन्च केली आणखी २७ शहरांमध्ये ५ जी सेवा; महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा आहे समावेश

त्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, ग्राहकांच्या लीक झालेल्या माहितीमध्ये त्यांचे नाव, ईमेल आयडी , पत्ता आणि इतर संवेदनशील माहितीचा समावेश आहे. हॅकर्सनी बँकेच्या नावाचा वापर करून एक ट्विटर अकाऊंड देखील क्रिएट केले होते. ज्याचा वापर करून हॅकर्स वापरकर्त्यांच्या तक्रारींना प्रतिसाद देत होते.

HDFC बँकेने फेटाळला दावा

एचडीएफसी बँकेने या अहवालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बँकेने डेटा लीक झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, HDFC बँकेत कोणताही डेटा लीक झालेला नाही. आमच्या सिस्टीममध्ये कोणीही अनधिकृतपणे प्रवेश केलेला नाही. आम्हाला आमच्या सिस्टीमवर विश्वास आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेबाबत गंभीर आहोत. तसेच बँक डेटा सुरक्षा आणि सुरक्षा मानकांचे पालन करते.

बँकेच्या अनेक वापरकर्त्यांनी HDFC बँकेच्या नावाने फिशिंग स्कॅम होत असल्याची तक्रार केली आहे. यासंबंधीच्या तक्रारींवर बँकेने ट्विटरवर प्रकीर्या दिली आहे. बँकेने वापरकर्त्यांना पॅन कार्ड, केवायसी अपडेट किंवा इतर बँकेचे डिटेल्स कोणत्याही अनोळखी नंबरवर शेअर करू नयेत असे सांगितले आहे.

हेही वाचा : Disney + Hotstar च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; IPL आणि HBO बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

फिशिंग स्कॅमपासून कसे वाचावे ?

फोन अणि अ‍ॅक्टिव्ह सिमकार्ड वापरणारा व्यक्ती हा फिशिंग स्कॅमला बळी पडू शकतो. अशा प्रकारांमध्ये स्कॅम करणारे हॅकर्स आपण बँकेचे अधिकारी असल्याचे वापरकर्त्यांना भासवतात आणि त्यांची फसवणूक करतात. बहुतांशी प्रकरणांमध्ये हॅकर्स वापरकर्त्यांना फेक मेसेज पाठवतात आणि त्यांच्या अकाउंटचे डिटेल्स ,ओटीपी क्रमांक आणि आयडी क्रमांक विचारतात आणि फसवणूक करतात.

वापरकर्त्यानी फसवणूक होऊ नये म्हणून अशा फेक कॉल्सपासून सावध राहणे आवश्यक आहे. अशा अनोळखी नंबरवरून फोन किंवा यासंदर्भातील मेसेज आला तर तो नंबर ब्लॉक करावा. तसेच तुमच्या अकाऊंटच्या लॉग इनसाठी स्ट्रॉंग पासवर्ड सेट करावा.