Honor 70 5G स्मार्टफोन मलेशिया मध्ये लाँच झाला आहे. नवीन Honor स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. या स्मार्टफोनमध्ये कर्व्ड ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. Honor च्या या फोनला ५४ मेगापिक्सेल Sony IMX800 प्राइमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. Honor 70 5G मध्ये ४८०० mAh बॅटरी देण्यात आली आहे. Honor 70 5G ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल सर्व काही जाणून घेऊया…

Honor 70 5G Price
Honor 70 5G च्या ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,९९९ MYR (सुमारे ३५,६०० रुपये) आहे. हा फोन अनेक ई-कॉमर्स साइट्सवर तसेच कंपनीच्या मलेशिया वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन क्रिस्टल सिल्व्हर, मिडनाईट ब्लॅक आणि एमराल्ड ग्रीन कलरमध्ये येतो.

जागतिक बाजारात Honor 70 5 ची उपलब्धता आणि किंमत याबद्दल कोणतीही माहिती नाही.

Honor 70 5G specifications
Honor 70 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा फुलएचडी+ OLED डिस्प्ले आहे जो १,०८०×२,४०० पिक्सेलचा HD+ रिझोल्यूशन ऑफर करतो. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे आणि रिफ्रेश रेट १२० Hz आहे. नवीन Honor फोनमध्ये Octa-core Snapdragon 778G+ प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 642L GPU आहे. फोनमध्ये ८ GB रॅम देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये २५६ GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे. हा Honor स्मार्टफोन Android 12 आधारित Magic UI 6.1 वर चालतो.

आणखी वाचा : Vivo Y22s स्मार्टफोनची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, ५० MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही….

Honor 70 5G ला पॉवर करण्यासाठी, ४८०० mAh बॅटरी दिली आहे, जी ६६ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Honor 70 5G चे परिमाण १६१.४×७३.३×७.९१ mm आणि वजन १७८ ग्रॅम आहे. हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्ट उपलब्ध आहेत.

Honor 70 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये ५४ मेगापिक्सलचा Sony IMX800 सेन्सर आहे ज्यामध्ये अपर्चर F/१.९ आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो सेन्सर असून अपर्चर F/२.२ आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा एफ/२.४ अपर्चरसह आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, Honor 70 5G मध्ये ब्लूटूथ ५.२ , GPS, A-GPS, OTG, USB Type-C पोर्ट, ३.५ mm हेडफोन जॅक आणि Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/AX सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. अॅम्बियंट लाइट सेन्सर, ग्रॅव्हिटी सेन्सर, जायरोस्कोप, कंपास आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर फोनमध्ये आहेत.

Story img Loader