Honor कंपनीने आज भारतात आपला Honor 90 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Honor च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC चा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यात वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी आणि ६६ W वायर्ड सुपरचार्ज टेक्नॉलॉजी मिळणार आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. ज्यात अनेक नवीन अपडेट्स व फिचर मिळतात. हा फोन कंपनीने तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याचा कॅमेरा , फीचर्स आणि किंमत याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Honor 90 5G : फीचर्स

honor च्या या नवीन फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. याचे रिझोल्युशन हे १.५ के इतके आहे. तर याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनला Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC सपोर्ट येतो. ज्यात १२८ जीबी LPDDR5 रॅम आणि २५६ जीबी इतके UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आपले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित OS ७.१ वर चालतो. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

Poco C75 and Poco M7 Pro launched in India
Poco C75 : भारतातला सर्वांत कमी किमतीचा ५जी स्मार्टफोन! 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह असणार अनेक फीचर्स
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
OnePlus 13 and OnePlus 13R launch in India
वर्षाची सुरुवात होणार धमाकेदार! स्लिम डिझाइन, शानदार कॅमेरा लेआउटसह OnePlus 13 भारतात होणार लाँच
vaibhav patil loksatta online quiz winner
वैभव पाटील ठरले लोकसत्ता ऑनलाईन निवडणूक मेगा क्विझचे विजेते; जिंकला स्मार्टफोन
sidharth shukla mother rita celebrated son birth anniversary video viral
Video: सिद्धार्थ शुक्लाच्या आईने दिवंगत लेकाचा ‘असा’ साजरा केला जन्मदिवस, सेलिब्रेशनमध्ये शहनाज गिलची अनुपस्थिती
lagira zala ji fame mahesh jadhav purva shinde rahul magdum played banjo in Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding
Video: किरण-वैष्णवीच्या सप्तपदीला ‘लागिरं झालं जी’मधील कलाकारांनी वाजवला बँन्जो, पाहा व्हिडीओ
devmanus fame kiran gaikwad And Vaishnavi Kalyankar tied the knot
नांदा सौख्यभरे! अखेर किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर अडकले लग्नबंधनात, मोठ्या थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
Top Mobile Launches 2024 in Marathi
Top Mobile Launches 2024: आयफोनपासून ते वनप्लसपर्यंत… २०२४ मध्ये ‘हे’ स्मार्टफोन्स ठरले सगळ्यात बेस्ट

हेही वाचा : Poco च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट; जाणून घ्या हा फोन खरेदी करण्याची ४ कारणे

तसेच honor ९० ५जी स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तसेच अल्ट्रा वाइड अँगलसह १२ मेगापिक्सलचा सेन्सर आणि LED फ्लॅश युनिटसह २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील या सेटअपमध्ये मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा वापरकर्त्यांना मिळणार आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यासाठी यामध्ये ६६W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात फोन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS आणि USB टाइप-सी अशी फीचर्स यात मिळतात.

Honor 90 5G : भारतातील किंमत आणि उपलब्धता

भारतात Honor 90 5G हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८/२५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये आहे. तर १२/५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन १८ सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर हा फोन उपलब्ध असेल. ई कॉमर्स वेबसाईटवर ग्राहकांना २ हजारांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळणार आहे. तर ICICI आणि SBI कार्डने व्यवहार करणाऱ्या ग्राहकां ३ हजारांचा झटपट डिस्काउंट मिळणार आहे. खरेदीदार खरेदीच्या ३० दिवसांच्या आत गरज भासल्यास हँडसेट एक्सचेंज देखील करू शकणार आहेत.

Story img Loader