Honor Band 7 Launch : हॉनरने फिटनेस प्रेमींसाठी नवीन Honor Band 7 लाँच केला आहे. या बँडमध्ये १.४७ इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून पूर्ण चार्ज केल्यावर त्यातून १४ दिवसांपर्यंतचा बॅटरी बॅकअप मिळतो, असा दवा कंपनीने केला आहे. हॉनर बँड ७ मध्ये आणखी कोणते फीचर्स मिळतात आणि त्याची किंमत काय? जाणून घेऊया.
फीचर
Honor Band 7 अँड्रॉइड ९.० आणि त्यावरील ओएस असलेल्या उपकरणांशी सुसंगत होतो, तर आयओएसच्या बाबतीत तो ११.० आणि त्यावरील ओएस असलेल्या उपकरणांशी सुसंगत होतो. या फिटनेस बँडमध्ये ९६ स्पोर्टमोड्स मिळतात आणि त्यात ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग आणि ट्रॅक स्लिप फीचर्स मिळतात.
(आता व्हॉट्सअॅपवरूनही बुक करू शकता Uber Cab, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
हॉनर बँड ७ एक्सेलेरोमीटर, एक गायरो सेन्सर आणि ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सरसह सुसज्ज आहे. या बँडला ५ एटीएम वाटर रेझिस्टेंट रेटिंग मिळाले असून याचा अर्थ हा बँड ५० मीटर खोल पाण्यात १० मिनिटांपर्यंत टिकू शकतो. बँडमध्ये मॅग्नेटिक पोल थिंबल चार्जिंग पोर्ट, ब्लूटूथ ५.० २.४ गिगाहर्ट्झ डेटा कनेक्टिव्हिटी मिळते.
कंपनीनुसार, एका पूर्ण चार्चिंगवर Honor Band 7 १४ दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो आणि जास्त वापर केल्यास १० दिवस चालतो. हा फिटनेस बँड नाइट ब्लॅक, सिडार ब्ल्यू आणि रोझ पिंक या तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
(Flashback 2022 : २०२२ मध्ये ‘या’ 5 गॅजेट्सनी घेतला ग्राहकांचा निरोप, फीचर्समुळे राहिले चर्चेत)
किंमत
हॉनर बँड ७ चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, हॉनर बँडची किंमत अंदाजे ३ हजार रुपये आहे, मात्र सध्या तो २ हजार ३०० रुपयांच्या प्री सेल डिस्काउंट किंमतीमध्ये उपलब्ध आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा बँड विक्रीसाठी उपलब्ध होईल.