या वर्षातील सर्वात मोठा मोबाईल शो बार्सिलोनो येथे होत आहे. २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत हा शो होणार आहे. या शो मध्ये अनेक स्मार्टफोन्स कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करणार आहेत. या शो मध्ये Honor कंपनीने देखीलआपली नवीन सिरीज लॉन्च केली आहे. या शिवाय, कंपनीने Honor Magic Vs देखील लॉन्च केले आहे. हा चीनच्या बाहेर लॉन्च होणार कंपनीचा पहिला फोल्डेबल फ्लॅगशिप आहे. Honor Magic VS च्या किंमतीबद्दल, फीचर्सबद्दल आणि स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊयात.
Honor Magic Vs चे फीचर्स
Honor Magic VS हा चीनच्या बाहेर लॉन्च होणारा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचा दावा केला जात आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना ७.९ इंचाचा इंटर्नल आणि ६.४५ इंचाचा एक्सटर्नल स्क्रीन मिळणार आहे. यामध्ये ५०००mAh ची बॅटरी आणि त्याला HONOR 66W सुपरचार्ज होणार चार्जर देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये Adreno 730 GPU सह Snapdragon 8 Gen 1 SoC हा प्रोसेसर येतो. मॅजिक सिरींजमधील इतर दोन स्मार्टफोन्सप्रमाणे Honor Magic Vs देखील अँड्रॉइड १३ वर आधारित आहे. हा स्मार्टफोन MagicOS 7.1 वर चालतो. तसेच वापरकर्त्यांना फोनमध्ये ५४ मेगापिक्सलचा एलईडी ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Honor Magic Vs ची किंमत
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला यूएसबी टाईप-सी केबलसह WiFi, Bluetooth आणि 5G कनेक्टिव्हिटी सपोर्ट उपलब्ध असणार आहे. Honor Magic Vs ची किंमत १,५९९ युरो (सुमारे १,४०,३०० रुपये ) आहे. तुम्ही हा फोन ब्ल्यू आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये खरेदी करू शकता. मात्र कंपनीने अद्याप अधिकृतरित्या स्मार्टफोनच्या उपलब्धतेबाबत कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.