Honor ने दीर्घ विश्रांतीनंतर भारतात पुनरागमन केले आहे. ‘Honor Pad 8’ नुकताच भारतात सादर झाला आहे. Honor Pad 8 मध्ये २K रिझोल्यूशनसह १२-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. याशिवाय Honor Pad 8 मध्ये Snapdragon ६८० प्रोसेसर देण्यात आला आहे.
Honor Pad 8 स्पेसिफिकेशन
Honor Pad 8 मध्ये १२-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १२००×२००० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा बॉडी-टू-स्क्रीन रेशो ८७ टक्के आहे आणि कमी प्रकाशासाठी TUV Rheinland ने प्रमाणित केले आहे.
Honor Pad 8 मध्ये Snapdragon ६८० प्रोसेसर आहे. Honor च्या या टॅब मध्ये १२८ जीबी स्टोरेज आहे तर, यात ५-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Honor Pad 8 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ v५.१ सह OTG साठी समर्थन आहे. Honor Pad 8 मध्ये Honor Histen आणि DTS:X Ultra साठी सपोर्ट असलेले ८ स्पीकर आहेत. त्याची रचना युनिबॉडी आहे.
(आणखी वाचा : Realme 10 सीरीजमुळे बाजारपेठेत उडाली खळबळ; ‘हा’ आहे कंपनीचा नवा प्लान! जाणून घ्या एका क्लिकवर )
Honor पॅड 8 ची बॅटरी
या टॅबमध्ये २२.५W चार्जिंग सपोर्टसह ७२५०mAh बॅटरी आहे. टॅबचे एकूण वजन ५२० ग्रॅम आहे. टॅबमध्ये ८ स्पीकर्सचा सपोर्ट देणात आला आहे. याचे डिझाइन युनिबॉडी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, हा टॅब ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v5.1 आणि OTG सपोर्टसह येतो.
Honor Pad 8 ची किंमत
हा टॅबलेट सिंगल काळ्या रंगात सादर करण्यात आला आहे. तसेच Honor Pad 8 ला दोन रॅम व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. त्याच्या ४ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये आहे. २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डे २०२२ सेलमध्ये टॅबलेट खरेदी करता येईल.