Honor ने दीर्घ विश्रांतीनंतर भारतात पुनरागमन केले आहे. ‘Honor Pad 8’ नुकताच भारतात सादर झाला आहे. Honor Pad 8 मध्ये २K रिझोल्यूशनसह १२-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. याशिवाय Honor Pad 8 मध्ये Snapdragon ६८० प्रोसेसर देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Honor Pad 8 स्पेसिफिकेशन

Honor Pad 8 मध्ये १२-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १२००×२००० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा बॉडी-टू-स्क्रीन रेशो ८७ टक्के आहे आणि कमी प्रकाशासाठी TUV Rheinland ने प्रमाणित केले आहे.

Honor Pad 8 मध्ये Snapdragon ६८० प्रोसेसर आहे. Honor च्या या टॅब मध्ये १२८ जीबी  स्टोरेज आहे तर, यात ५-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Honor Pad 8 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ v५.१ सह OTG साठी समर्थन आहे. Honor Pad 8 मध्ये Honor Histen आणि DTS:X Ultra साठी सपोर्ट असलेले ८ स्पीकर आहेत. त्याची रचना युनिबॉडी आहे.

(आणखी वाचा : Realme 10 सीरीजमुळे बाजारपेठेत उडाली खळबळ; ‘हा’ आहे कंपनीचा नवा प्लान! जाणून घ्या एका क्लिकवर )

Honor पॅड 8 ची बॅटरी

या टॅबमध्ये २२.५W चार्जिंग सपोर्टसह ७२५०mAh बॅटरी आहे. टॅबचे एकूण वजन ५२० ग्रॅम आहे. टॅबमध्ये ८ स्पीकर्सचा सपोर्ट देणात आला आहे. याचे डिझाइन युनिबॉडी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, हा टॅब ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ v5.1 आणि OTG सपोर्टसह येतो.

Honor Pad 8 ची किंमत

हा टॅबलेट सिंगल काळ्या रंगात सादर करण्यात आला आहे. तसेच Honor Pad 8 ला दोन रॅम व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. त्याच्या ४ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये आहे. २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डे २०२२ सेलमध्ये टॅबलेट खरेदी करता येईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honor launches new tablet in india pdb